संपादकीय : परंपरेतूनच एकसंघपणा!

संपादकीय : परंपरेतूनच एकसंघपणा!

जीवनाच्या उत्क्रांतीत अनेक बदल होत असतात. ते अपेक्षितही आहेत. मात्रत्या उत्क्रांतीत जशी आयुष्याची घडी बसत जाते, तसे त्यातील काही पद्धती परंपरा बनत जातात. याच परंपरा पुढच्या आयुष्याला मार्गदर्शक ठरतात.

परंपरा म्हणजे अर्थातच आपल्या आयुष्याचे अनेकविध आयाम निभावण्याच्या पद्धती. यात आपले राहणीमान, जीवनशैली, खाद्यसंस्कृती, साहित्य, कला, पेहरावाच्या पद्धती, वागण्याच्या पद्धती, आदी अनेक गोष्टींचा समावेश असतो. परंपरा निभावल्याने काय होते? असाप्रश्न अनेकजण विचारु शकतात. काही लोकं त्याकडे गतकाळातील पद्धती, ज्या सध्या लागू पडत नाहीत अशाही नजरेने बघतील. बदलत्या काळात बदलती पद्धत आवश्यक आहेच, मात्र काही गोष्टींचा धागा हा धरुन ठेवावा लागतो. खास करुन नीतीमुल्य व वर्तनांच्या पद्धतींचा. आज परंपरेने आलेल्या या गोष्टींची समाजाला खूप जास्त आवश्यकता आहे, असे दिसते.

सध्याच्या उथळ जीवनशैलीचे आरोग्यावर आणि विचारांवर झालेले दुष्परिणाम आपण भोगत आहोतच. अशाच वेळेस परंपरेने आलेले गुण वापरल्यास त्याचा चांगला परिणाम होतो, असेही दिसते.

खाद्यसंस्कृतीमध्ये तर पारंपरिक पदार्थ, चुलीवरचे पदार्थ याचे नव्याने महत्व समजल्याने त्याची क्रेझही वाढताना दिसते आहे. कारण काहीही असो, मागचा धागा धरुन ठेवावा हेच सगळ्यांच्या हिताचे. ते करताना नव्याची कासही धरणे आवश्यक आहे, हे अधोरेखित व्हायला हवे.

दिवाळीचा सण हा आनंदाचा, तेजाचा आणि परस्परांतील जिव्हाळ्याचा. याच दिवाळीचे औचित्य साधून मदेशदूतफने हा विशेष दिवाळी अंक डिजिटल स्वरुपात आपणासमोर आणला आहे. परंपरेचे महत्व सगळ्यांपर्यंत पोहोचावे, परंपरांकडे समाजाने सजगतेने पाहावे, त्यानिमित्ताने पुन्हा एकदा गतवैभवास उजळा मिळावाआणि त्याचा फायदा सर्वांना व्हावा एवढाच काय तो हेतू !

हा हेतू आमच्या लेखकांनाही पटला आणि म्हणून वेगवेगळ्या नजरेतून आम्ही परंपरेकडे बघू शकलो. सर्व लेखकांनी परंपरांकडेअभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून बघितले.अतिशय वाचनीय व संग्राह्य लेख त्यांनी देशदूत डिजिटल दिवाळी अंक मपरंपरा विशेषफला दिले, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. आपणासही वाचक म्हणून परंपरेविषयी जाणून घेताना निश्चितच अभिमान व आनंद वाटेलअशी खात्री आहे. मवसुधैव कुटुंबकमफकडे जाताना भारताचा ठसा, आपली ही परंपराच उमटवू शकते. भिन्न जीवनपद्धतींमधून एकसंघपणा या देशाला मिळतो तो या परंपरेतूनच. आणि हीच परंपरा आपलं भारतीय अस्तित्व कायम ठेवते. हा अंक आपल्या हाती देताना या गौरवशाली परंपरेचा ठेवा सर्वानी जपावा हीच इच्छा !

- संपादक.

डॉ. वैशाली बालाजीवाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com