Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

घटस्फोट न दिल्याच्या कारणावरून ब्राम्हणीत मारहाण

Share

राहुरी (प्रतिनिधी) – तुम्ही आमच्या मुलाला घटस्फोट का देत नाही या कारणावरून मुलाच्या सासरकडील मंडळींना लोखंडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील ब्राम्हणी येथे घडली. तर चार जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये पुनम गणेश तेलोरे (रा. ब्राम्हणी, ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ब्राम्हणी येथील आमच्या घरासमोर येऊन आरोपींनी तुम्ही आमच्या मुलाला घटस्फोट का देत नाही, असे म्हणत अशोक देशमुख यांनी त्यांच्या हातातील लोखंडी पाईपने फिर्यादीचे सासरे बापूसाहेब तेलोरे यांच्या डोक्यात मारले व दीपक देशमुख याने त्याच्या हातातील लाकडी दांड्याने पायावर हातावर मारले. भाया रवींद्र तेलोरे यांना विलास शिंदे यांनी हातातील लोखंडे पाईपने मारहाण केली. तसेच फिर्यादीची सासू व दोघींनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. तुम्ही आमच्या मुलाला घटस्फोट दिला नाही तर तुमचा मुडदा पाडील, असा दम दिला. वरीलप्रमाणे पुनम तेलोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भादंवि कलम 326, 324, 504, 506, 143, 147, 148, 149 मु.पो.का.कलम 37 (1), (3) 135 प्रमाणे आरोपी अशोक देशमुख (पूर्ण नाव माहीत नाही), सुनीता अशोक देशमुख, दीपक अशोक देशमुख (सर्व रा. वळण, ता.राहुरी), विलास शिंदे (पूर्ण नाव माहीत नाही), हिरा विलास शिंदे (दोघे रा.खिर्डी, ता.श्रीरामपूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये भाया रवींद्र तेलोरे, सासू मंगल बापूसाहेब तेलोरे, सासरे बापूसाहेब आनंद तेलोरे, पुनम गणेश तेलोरे (सर्व रा.ब्राम्हणी, ता. राहुरी) हे जखमी झाले आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल डी.डी. तुपे करीत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!