मुळा प्रवरा कामगारांना लाभांश

0

डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडून आश्‍वासनपूर्ती

श्रीरामपूर(प्रतिनिधी)- राहुरीतील डॉ.बा.बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू करून आणि मुळा प्रवरा वीज संस्थेतील कामगारांना पतसंस्थेच्या माध्यमातून लाभांश देऊन डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेला शब्द पाळून एकेका आश्‍वासनांची पूर्ती केली आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या आदर्शाला पुढे नेण्याचे काम डॉ. सुजय विखे पाटील करीत आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन मुळा प्रवरा वीज संस्थेचे ज्येष्ठ संचालक जलीलखान पठाण यांनी केले.

राहुरीतील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना अथक प्रयत्नातून सुरू केल्याबद्दल तसेच मुळा प्रवरा वीज कामगार पतसंस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या कामगारांना लाभांश वाटप केल्याबद्दल मुळा प्रवरा वीज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव श्री. पठाण यांनी संस्थेच्या संचालक मंडळ बैठकीत मांडला. त्यास संचालक चित्रसेन रणनवरे यांनी अनुमोदन दिले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष जी.के.पाटील होते.
श्री. पठाण म्हणाले, यापूर्वी राहता तालुक्यातील श्रीगणेश आणि आता राहुरी तालुक्यातील डॉ. तनपुरे हे दोन्हीही साखर कारखाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डॉ. सुजय विखे पाटील यांनी सुरू करून या दोन्हीही तालुक्यांतील हजारो ऊसउत्पादक आणि कामगार यांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती केली आहे. याशिवाय मुळा प्रवरा वीज कामगार पतसंस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या कामगारांना लाभांश वाटप करून कामगारांना न्याय दिला आहे.
प्रारंभी श्री.पठाण यांच्या हस्ते डॉ. सुजय विखे पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन तर लाभांश वाटपाबद्दल ज्येष्ठ संचालक आंबादास ढोकचौळे यांचा चंद्रकांत गवळी, नवाज शेख, बाळासाहेब ढोकचौळे, सुभाष गायकवाड, एजाजअहमद सय्यद, विष्णू मोढे या कामगारांनी सत्कार केला.
यावेळी सर्व संचालकांसह कार्यकारी संचालक श्री.जे.जी. कर्पे, सुनील सोनवणे, राजेंद्र दंडापूर, सुनील गलांडे, पोपटराव कवडे, विजय शेलार, सोपानराव गोरे, बाळासाहेब अंत्रे, शफीक बागवान, किशोर आढाव, झुंजारराव राजेभोसले, सुभाष प्रधान, नवनाथ जेजूरकर, रघुनाथ भांड, अशोक गिरनार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*