त्र्यंबकेश्वर : नगराध्यक्षा विजया लढढा यांच्यावरील अविश्वास ठराव यादी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल

0

त्र्यंबकेश्वर | त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा विजया दिपक लढढा यांच्यावर अविश्वास  ठराव आणण्यासाठी त्र्यंबकेश्वर पालिकेतील 17 पैकी 13 नगरसेवकांनी यादी दाखल केली आहे.

ञ्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पालिका सदस्यांना विश्वासात न घेता कार्यभार करत असल्याने त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी विशेष सभा चालविण्यात यावी असा अर्ज 13 नगरसेवकांच्या स्वाक्ष-यांसहित काल शनिवार दि(17) जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आला आहे.

हा अर्ज दाखल करते वेळेस सर्व 13 नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात ओळख परेड देखील घेण्यात आल्याचे समजते. या अर्जावर यागेश विश्वनाथ तुंगार, रविंद्र शांताराम सोनवणे, यशोदा सुनिल अडसरे, अलका राजेंद्र शिरसाट, अंजना मधुकर कडलग, रविंद्र मोहन गमे, सिंधुबाई दत्ता मधे, ललीत बाळासाहेब लोहगावकर, अभिजीत मधुकर काण्णव, अनघा नारायण फडके, तृप्ती पंकज धारणे, शकुंतला धनंजय वाटाणे, आशा माधव झोंबाड यांच्या स्वाक्ष-या आहेत.

गत काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर पालिका राजकरणात धुमसत असलेल्या असंतोषाला आता अविश्वास ठरवाला सामोरे जावे लागणार आहे. सहा दिवसांपुर्वी 13 नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना झाले तेव्हाच अविश्वास ठरावाची जमवाजमव सुरू झाली होती.

शहर विकास आराखडयाच्या बाबत झालेल्या जमीन पिवळया ठरावाने सत्तारूढ गटात फुट पडली व प्रकरण थेट अविश्वासापर्यंत गेले आहे. अर्थात नगराध्यक्षा विजया लढढा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सत्ताधारी गटातील दोन नगरसेवकांनी सुमारे दोन महिन्यांपासून लावून धरली होती.

भाजपाच्या तृप्ती धारणे यांना नगराध्यक्षपदी बसविण्यासाठी विजया लढढा यांचा राजीनामा मागतीला जात होता. सन 2012 च्या सार्वत्रीक निवडणूकीत मनसे 6,राष्ट्रवादी 4,काँग्रेस 3,अपक्ष 2,शिवसेना 1,भाजपा 1 असे पक्षीय बलाबल होते.

अगदी प्रारंभी मनसे-,काँग्रेस शिवसेना,-भाजपा आणि अपक्ष असा 13 नगरसेवकांचा गट तयार झाला त्याचे योगेश तुंगार हे गटनेते होते तर चार राष्ट्रवादी ४ हे विरोधात होते त्यांचे गटनेते रविंद्र सोणवने होते. योगेश तुंगार बिनविरोध नगराध्यक्ष झाले.

त्यानंतर अवघ्या दोन वर्षांच्या आत सत्तारूढ गटात फुटपडली तेव्हा काँग्रेसचे 3 आणि अपक्ष असलेल्या विजया लढढा विरोधी गटाला जाऊन मिळाल्या मात्र सत्ता पहिल्याच गटाकडे राहीली तेव्हा यशोदा अडसरे नगराध्यक्ष झाल्या. त्यानंतर वर्षभराच्या आत पुन्हा गट तुटला तृप्ती धारणे विरोधी गटाला जाऊन मिळाल्या तेव्हा 9 सदस्य झाले आणि राष्ट्रवादीच्या अलका शिरसाठ अध्यक्ष झाल्या सहा महिन्यात पुन्हा संगीत खुर्चीचा खेळ झाला तेव्हा आरक्षण बदलले होते सर्वसाधारण महिला आरक्षण झाले तेव्हा पुन्हा घडामोडी झाल्या.

सहा महिने सत्तेपासून दुर असलेला मनसे गट सक्रिय झाला त्यांनी अपक्ष विजया लढढा यांना सोबत घेतले आणि अनघा फडके नगराध्यक्ष झाल्या.दरम्यान भाजपाच्या तृप्ती धारणे पराभुत झाल्या आणि विशेष म्हणजे त्यांना पराभुत करणारे मनसे 6 ,अपक्ष 2 असे आठ सदस्य भाजपात दाखल झाले व सिंहस्थ कालवाधी असतांना येथे भाजपाची सत्ता अशा प्रकारे तयार झाली.

दरम्यान सहा महिन्यानंतर पुन्हा नगराध्यक्ष निवडणूकीचा पट मांडण्यात आला व विजया लढढा यांना उमेद्वारी देण्यात आली. विरोधात असलेले आणि विजया लढढा यांच्या मुळे पराभुत झालेल्या भाजपाच्या तृप्ती धारणे यांना उमेदवारी दिली तेव्हा राष्ट्रवादीचे 4 काँग्रेस 2 व भाजपा 1 असे सेनेच्या तंबुत दाखल झाले. शिवसेनेने सत्तारूढ गटाकडे असलेला व चिन्हावर निवडुन आलेला एकमेव शिवसेना सदस्य आपल्याकडे खेचण्याच प्रयत्न केला मात्र तसे घडले नाही व विजया लढढा नगराध्यक्षा झाल्या.

साधरणत: 3 महिन्यांपुर्वी भाजपाच्या तृप्ती धारणे यांना नगराध्यक्षा करावे असे ठरविण्यात आले त्या करिता विरोधी गटातील सर्व सदस्य व सत्तारूढ गटातील 5 असे एकुण 13 सदस्यांनी एकमत झाले आहे.

विजया लढढा यांच्या वतीने त्यांचे पती दिपक लढढा यांनी देखिल राजीनामा देणार असल्याचे अशा बैठकांमधून सुचित केले होते. दरम्यान शहर विकास आराखडयावरून किरकोळ अटीशर्तीचे वाद विकोपास गेले व (दि.१७) शनिवारी थेट अविश्वास ठरावाची मागणी करणारी यादी दाखल झाली आहे.

LEAVE A REPLY

*