Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

शिवाजी चुंबळे यांच्यावर ‘अविश्वास’; युवराज कोठुळे नाशिक कृउबाचे हंगामी सभापती

Share

पंचवटी | वार्ताहर

नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती शिवाजी चुंबळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आज मांडण्यात आला. यावेळी  16 संचालक उपस्थित होते. त्यातील 15 संचालकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. तर संचालक संदीप पाटील हे तटस्थ राहिले. यामुळे सभापती शिवाजी चुंबळे यांना सभापतीपदाला मुकावे लागले आहे. यानंतर अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलेल्या युवराज कोठुळे यांची हंगामी सभापती म्हणून निवड करण्यात आली.

माजी सभापती चुंबळे यांच्यावर आज होत असलेल्या अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

गेल्या काही दिवसांपूर्वी तत्कालीन सभापती चुंभळे व संचालक संपतराव सकाळे यांच्यात अविश्वास ठरावच्या मुद्यावरुन फ्री स्टाईल हाणामारी झाली होती.

यावेळी चुंबळे यांच्या विरोधात बाजार समितीचे बारा संचालक एकवटले होते. त्यांनी सभापती चुंभळे यांच्याविरुध्द अविश्वासाचे जिल्हा उपनिबंधकांना देण्यासाठी गेले असता तेथे हा प्रकार घडला होता. त्यानंतर  या संचालक मंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याकडे अविश्वासाचे दिले होते.

त्यानुसार आज चुंबळे यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्यात आला. गेल्या काही दिवसांपूर्वी चुंभळे यांचे स्वाक्षर्‍यांचे अधिकार काढून ते सकाळे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 12 संचालकांनी एकत्र येत चुंभळे यांच्याविरोधात अविश्वास आणण्यासाठी प्रयत्न केले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!