जिल्ह्यात सरासरी 142 टक्के पाऊस

0
11 तालुक्यांत शंभरपेक्षाही अधिक सरासरी
अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यात परतीचा पाऊस सर्वदूर होत असल्याने यंदा पावसाच्या सरासरीने तब्बल 141.64 टक्क्यांपर्यंत बाजी मारली आहे. याच काळात गेल्यावर्षी 136 टक्के पावसाची नोंद होती.
अकोले तालुक्यातने 197 टक्के, राहाता 178, श्रीरामपूर 154, नेवासा 151 टक्के पावसाची नोंद झाली आहे. पारनेर, कर्जत, श्रीगोंदा, जामखेड या तालुक्यांच्या सरारसरीने दीडशेच्या आसपास मजल मारली आहे. कोपरगाव तालुक्यात केवळ 92 टक्के पाऊस झाला. या तालुक्यात गतवर्षी 120 टक्के पाऊस झाला होता.
शनिवारी पडलेल्या पावसाची सर्वाधिक नोंद श्रीरामपूर 35, त्या खालोखाल श्रीगोंदा 31 मिमी पावसाची नोंद झाली आहे. संगमनेरात 29 तर अकोलेत 26 मिमी पाऊस झाला.
26000 दलघफू क्षमतेचे मुळा, 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा ही दोन्ही धरणे तुडुंब भरली आहेत. निळवंडे, आढळा, मांडओहळ, सीना, खैरी या धरणांचीही तीच स्थिती आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर आणि कर्जतला वरदान असलेल्या कुकडी प्रकल्पातही समाधानकारक साठा आहे.
घोड धरणही 100 टक्के भरले आहे.
गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सर्वदूर हजेरी लावत आहे. असे असलेतरी उकाडा मात्र कमी झालेला नाही.

भंडारदरात 21 दलघफू पाणी दाखल –
पाणलोटात पाऊस झाल्याने भंडारदरा धरणात 21 दलघफू पाणी दाखल झाले. ते पाणी वापरण्यात आले. भंडारदरा वार्ताहराने कळविले की, दोन दिवसांपासून पाणलोटात पाऊस कोसळत आहे. गत 24 तासांत भंडारदरा 25, रतनवाडी 47, वाकी 35 मिमी पाऊस पडला. आवक होत असल्याने सकाळी 11 वाजता विद्युत क्रमांक एकमधून 820 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. रात्री आठ वाजेपासून रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरू होता. 

टाकळीभानमध्ये 891 वडाळ्यात 902 मिमी पाऊस –
अकोले तालुक्यातील सर्व महसूल मंडलांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. हा तालुका वगळता यंदाच्या हंगामात उत्तरेत नेवासा तालुक्यातील वडाळा बहरिोबा येथे 902 तर श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानमध्ये 891 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जामखेडमध्येही 918 मिमी पाऊस पडला.
येथे झाला 700 मिमी पेक्षा अधिक पाऊस –
नेवासा 802, सलाबतपूर 703, सोनई 722, सुपा 710, शेवगाव 717, श्रीरामपूर 724, राहाता 785, बाभळेश्‍वर 714, लोणी 737, अकोले 998, समेशरपूर 862, कोतूळ 824, साकीरवाडी 1325. कर्जत 735,राशिन 773, भांबोरा 767, कोंभळी 794, जामखेड 918, खर्डा 882, अरणगाव 732, नान्नज 705.

 

 

LEAVE A REPLY

*