Friday, May 3, 2024
Homeनगरसंसर्गजन्य विषाणू बाधित भागातील 5 किलो मीटर परिसरात लसीकरण

संसर्गजन्य विषाणू बाधित भागातील 5 किलो मीटर परिसरात लसीकरण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून जिल्ह्यात शिरकाव करू पाहणार्‍या संसर्गजन्य विषाणू असणार्‍या लंपी स्कीन डिसीजला

- Advertisement -

जिल्ह्याच्या सीमेवर रोखण्याचा निर्णय जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे. यामुळे नेवासा तालुक्यातील बाधित असणार्‍या गोधेगाव आणि परिसरातील पाच किलो मीटर अंतरावरील गावांतील 3 हजार 400 जनावरांचे तातडीने लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी दिली.

दरम्यान, जिल्ह्याभरातून या संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी 50 हजार लसींची मागणी झाली आहे. जिल्हा परिषद सेवा शुल्कमधील निधीतून 46 हजार लस उपलब्ध होऊ शकते. शेतकर्‍यांनी आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी केले आहे.

जिल्ह्यातील गाय, बैल, म्हैस, कालवड, वासरे, गोर्‍हेे यांच्यावर लंपी स्कीन डिसीज संसर्गजन्य विषाणूचा प्रादूर्भाव झाला आहे. नेवासा तालुक्यातील गोधेगाव याठिकाणी या विषाणूने ग्रस्त 22 जनावरे आढळली असून जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती गडाख यांनी गुरूवारी तातडीने त्या ठिकाणी पशूसंवर्धन विभगाच्या डॉक्टरांची चमू पाठवून उपचार सुरू केले आहेत. तसेच या विषाणूचा जिल्ह्यात फैलाव होवू नयेत, यासाठी लसीकरण करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

राज्यात दीड महिन्यांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात लंपी स्कीन डिसिज या संसर्ग विषाणूचा जनावर प्रार्दभाव झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर या विषाणूचा मराठवाड्यातील बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात फैलाव पहावसाय मिळाला.

सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात या विषाणूचा प्रार्दभाव वाढलेला आहे. हा विषाणूची लागण झाल्यानंतर जनावराला ताप येवून त्यांच्या अंगावर मोठ-मोठ्या गाठी येवून त्या गाठी काही दिवसांनी फूटून त्यातून पू निघतो. या विषाणूचा एका जनावरातून दुसर्‍या जनावरात चावणार्‍या माशा (किटक), डास आणि गोचिड यांच्या मार्फत झपाट्याने होतो.

लिंप स्कीन डिसीजला रोखण्यासाठी गोट फॉक्स (शेळ्यांची देवी) ही लस उपयुक्त आहे. ही लस गाय, बैल, म्हैस, कालवड, वारसे, गोरे यांना टोचल्यास त्यांना या संसर्गजन्य विषाणूची बाधा होणार नाही. यामुळे जिल्ह्यातून शुक्रवारी दिवसभरात गोट फॉक्स या 50 हजार लसीची मागणी जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाकडे नोंदविण्यात आली आहे.

जिल्हा परिषदे पशूसंवर्धन विभाग पहिल्या टप्प्यात त्यांच्याकडे असणार्‍या सेवा शुल्कच्या निधीतून 46 हजार लस विकत घेवून त्याव्दारे लसीकरण करू शकणार आहे. मात्र, त्यानंतर लसीची गरज भासल्यास त्यासाठी वेगळी तरतूद लागणार आहे. दरम्यान, तातडीचा उपाय म्हणून नेवासा तालुक्यातील गोधेगाव आणि परसारातील पाच किलो मीटर अंतरातील भालगाव, वाशिम आणि टोका या चार गावातील 3 हजार 400 जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या