Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

राज्य बुद्धिबळसाठी जिल्ह्याचा संघ जाहीर; मोर्फी जिल्हा स्पर्धेत सृष्टी, अरुण अजिंक्य

Share

नाशिक । प्रतिनिधी

मोर्फी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत वरुण वाघ, सृष्टी रांका यांनी अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अगामी काळात होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 17 वर्षांखालील नाशिक जिल्हा बुद्धिबळ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला.

मोर्फी चेस अ‍ॅकेडमी नाशिक यांच्यातर्फे हंगामी बुद्धिबळ समिती, नाशिक यांच्या मान्यतेने 29 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान 17 वर्षांखालील मुले व मुलींसाठीच्या नाशिक जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा मोर्फी ट्रेनिंग हॉल, टिळकवाडी येथे झाल्या. या स्पर्धेत मुलांच्या गटात वरुण वाघ (केटीएचएम कॉलेज), आदिनाथ भिसे (सेंट फ्रान्सिस शाळा) तर मुलींच्या गटातून सृष्टी रांका (न्यू इरा स्कूल), सिया कुलकर्णी (किलबिल शाळा) यांची राज्यस्तरावर निवड झाली. हे खेळाडू एप्रिल महिन्यात होणार्‍या 17 वर्षांखालील राज्य बुद्धिबळ स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.

मुलांच्या गटातील पहिल्या पाच विजेत्यांना रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. तर मुलींच्या गटातील विजेत्या खेळाडूंना आकर्षक भेटवस्तू तसेच मेडल्स देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ विजेता (सी ग्रुप), मुंबई व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता वरुण वाघ व जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी सृष्टी रांका यांच्यासह एकूण सात आंतरराष्ट्रीय रेटिंगप्राप्त खेळाडूंचा विशेष सहभाग होता. या स्पर्धेत अनेक बाल खेळाडूंनीसुद्धा सहभाग घेतला होता. त्यातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंना विशेष बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.

मोठ्या टाईम कंट्रोलचे सामने खेळण्याची सुवर्णसंधी, मुलांच्या गटातील प्रत्येक खेळाडूला 5 सामने खेळण्याची तर मुलींच्या गटात प्रत्येकी 3 सामने खेळण्याची संधी या स्पर्धेतून मिळाली. त्यामुळे खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची पुरेपूर संधी या स्पर्धेतून मिळाली. मुले व मुलींचे सामने वेगवेगळ्या गटात खेळवले गेले. प्रत्येकाला प्रत्येकी 30 मिनिटे 5 सेकंद इंक्रेमेंट अशा टाईम कंट्रोलने डाव खेळायला मिळाले. स्वीस लीग सिस्टिमने ड्रॉ काढण्यात आले.

ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन

या स्पर्धेत ग्रामीण भागातील खेळाडूंना मोफत प्रवेश देण्यात आला होता. तसेच मुलींना या स्पर्धेतून विशेष प्रोत्साहन देण्यात आले. नाशिकचे कॅन्डीडेट मास्टर व सुवर्णपदकप्राप्त राष्ट्रीय खेळाडू व महाराष्ट्रातील नामवंत प्रशिक्षक विनोद भागवत यांच्या प्रयत्नातून सेमी क्लासिकल पद्धतीने ही स्पर्धा घेण्यात आली.

निवड झालेले खेळाडू असे

मुले : 1) वरुण वाघ (केटीएचएम कॉलेज) 2) आदिनाथ भिसे (सेंट फ्रान्सिस शाळा)
मुली : 1) सृष्टी रांका (न्यू इरा स्कूल) 2) सिया कुलकर्णी (किलबिल शाळा)

विशेष प्रोत्साहनपर बक्षिसे – सम्यक लोखंडे, आर्य बहाळकर, नील अध्वर्यू, शर्वणी सामंत,
आकांक्षा भिसे, तनिष्का राठी, अस्मी पाटील

9 वर्षांखालील : 1) शर्विल पाटील 2) ताराक्ष कटियार 3) अस्मी पाटील
11 वर्षांखालील : 1) आदित्य वाणी 2) गार्गी येवलेकर
13 वर्षांखालील : 1) श्रेयस पेखळे

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!