Type to search

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

निधी कपातीवरून गोंधळ

Share

शिक्षक बँकेची 100 सर्वसाधरण सभा : सभेपूर्वीच पोलीस

अहमदनगर (प्रतिनिधी) – विसंवाद, खूर्च्याफेक, कपडेफाड अशा घटनांसाठी सुप्रसिद्ध असलेली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची ऐतिहासिक 100वी सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास सुरू झाली आहे. या सभेत पहिला वाद निधी कपातीच्या मुद्यावरून झाला आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून सभेपूर्वीच पोलिसांनी हजेरी लावत परिस्थितीचा ‘अंदाज’ घेतला.

रविवारी सकाळी सभेला प्रारंभ झाला. संचालक मंडळाने हसतमुख फोटोसेशन केल्यानंतर पुढील कामकाजाला प्रारंभ झाला. शताब्दी वर्षाच्या नावाने 2015पासून नफ्यातून केलेली लाखोंची तरतूद, विकास मंडळ ठेवी कपात, संचालक प्रवास भत्ता आणि गुरूमाऊली मंडळात पडलेली फूट आदी विषयांमुळे शताब्दीसभा गाजण्याची चिन्हे आहेत. त्याची चुणूक निधी कपातीच्या विषयावरून दिसून आली.

बँकेतून विकास मंडळासाठी दहा हजारांचा निधी कपात करण्याचा विषय रद्द करण्यात आला. तसेच मागील वर्षी कपात केलेला निधी वसूल करणार असल्याचे चेअरमन साहेबराव अनाप यांची घोषीत केले. या विषयावरून गोंधळ झाला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!