Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जिल्हा क्रीडा अधिकारी नवांदे सक्तीच्या रजेवर

Share

चौकशीनंतर बदली करणार असल्याचे शिक्षणमंत्री शेलार यांचे आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नवांदे-निंबाळकर यांच्याविरोधात असणार्‍या तक्रारीची शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दखल घेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश क्रीडा सचिवांना दिले आहेत. तसेच त्यांच्या कारभाराची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून त्यानंतर त्यांची नगरहून बदली करण्याचे आदेश दिले आहेत. पालकमंत्री राम शिंदे यांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर शिक्षणमंत्र्यांनी हे आदेश दिल्याची माहिती राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी दिली.

महिनाभरापासून क्रीडा शिक्षक संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला होता. क्रीडा शिक्षक संघटना, विद्यार्थी व पालक यांच्यात नवांदे यांच्याविरोधात मोठी नाराजी निर्माण होऊन संघर्षाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी पालकमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेऊन शिक्षणमंत्री शेलार यांच्यासोबत बैठक घेत जिल्हा क्रीडा अधिकारी नवांदे यांच्या मनमानीमुळे नगरच्या क्रीडा स्पर्धा बंद पडल्या आहेत.

क्रीडाशिक्षक, वयोवृद्ध तसेच सर्वसामान्य नागरिकांना नवांदे अपमानास्पद वागणूक देत असून त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. त्यांच्या कारभाराचा फटका शालेय खेळाडूंना बसत असून त्याचे मोठे नुकसान होत असल्याने नवांदे यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी शिक्षणमंत्री यांच्याकडे केली. त्यावर मंत्री शेलार यांनी तात्काळ क्रीडा सचिव राजेंद्र पवार यांना कार्यवाही करण्याचे आदेश देत नावंदे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश दिले. तसेच त्यांच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून त्याबाबतच अहवाल मंत्रालयास पाठवून त्यांची नगरहून रिक्त असणार्‍या जागेवर बदली करण्याचे आदेश दिले आहेत. जर अधिकार्‍यांमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होत असेल किंवा खेळाडूंचे नुकसान होत असेल तर ते शासन कदापि सहन करणार नाही. स्पर्धा बंद असल्याने खेळाडूंचे नुकसान होत आहे. त्यामुळे अशी मनमानी करणार्‍या अधिकार्‍यांना जिल्ह्यात थारा मिळणार नाही. उच्चपदस्थ अधिकार्‍याने चुकांची पाठराखण करणे हे सरकार कधीच सहन करणार नसल्याचा इशारा पालकमंत्री शिंदे यांनी दिला.

पालकमंत्री शिंदे यांच्यासह शिष्टमंडळाद्वारे शिक्षणमंत्री शेलार यांच्या भेटीला गेलेल्यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अभय आगरकर, स्वप्निल देसाई, महापौर बाबासाहेब वाकळे, राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेवराव ऱाऊत, मुख्याध्यापक महासंघाचे सचिव बाळासाहेब कळसकर, राज्य संघटना कोषाध्यक्ष घनश्याम सानप, महानगराचे अरविंद आचार्य, बबन गायकवाड, अजित वडवकर, कैलास सुपेकर, दत्तात्रय नेवसे तालुकाध्यक्ष महेंद्र हिंगे, भैय्या तोरडमल, तुषार पोटे आदी उपस्थित होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!