संगमनेर, कोपरगाव, राहात्यातील 15 रस्ते जिल्हा मार्ग दर्जोन्नत

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील राहाता, संगमनेर आणि कोपरगाव तालुक्यांतील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग, रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने दर्जोन्नत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती.
दर्जोन्नत करण्यात आलेले रस्ते- राहाता तालुका- प्रजिमा 21 ते हसनापूर लोणी बुद्रुक, आडगाव, केलवड, नांदुर्खी बुद्रुक. (निमगाव कोर्‍हाळे) प्ररामा 8 ला मिळणारा मार्ग. पाथरे बुद्रुक, लोणी खुर्द, पाथरे, पिंप्रीनिर्मळ, चोळकेवाडी, वाकडी, चितळी रस्ता. कोल्हार बुद्रुक (प्रजिमा21) राजुरी, गोल्हारवाडी, वाकडी, रामपूर, पुणतांबा रस्ता. खडकेवाके (रा.मा. 67) अस्तगाव, रांजणगाव खुर्द, एकरूखे, पिंपळवाडी, रूई रस्ता.पाथरे (प्रजिमा21) प्रवरानगर, तिसगाव ते मांडवे रस्ता. चांदेवाडी, राजुरी, पिंप्रीनिर्मळ, आडगाव बुद्रुक, पिंप्रीलोकाई, काकडी. प्ररामा 8 गोदावरी वसाहत ते रूई कोहकी ते रा.मा.36 रस्ता. खडकेवाके पिंपळस रा.मा. 67, दहिगाव, कोर्‍हाळे, वाळकी वेस रा.मा.35 (इजिमा222) रस्ता.
संगमनेर तालुका- राममा50 ते गुंजाळवाडी, वरूडी पठार, जवळे बाळेश्‍वर, पेमगिरी, निमगाव बुद्रुक, कळस बुद्रुक ते रामा50 ला मिळणारा रस्ता. राममा50 ते हिवरगाव, पठार साकूर ते प्रजिमा 23 ला मिळणारा रस्ता. प्रजिमा 23 पासून आभाळवाडी, डोंगरवाडी ते पळसपूर इजिमा 180 ला मिळणारा रस्ता. प्रजिमा 26 पासून हंगेवाडी, मालुंचे पानोडी पिंप्री लौकी, खळी, झरेकाठी, धानोरे, सोनगाव, सात्रळ, रामपूर, कोल्हार, चिंचोली, पिचडगाव, दवणगाव, केसापूूर, चांदगाव, करजगाव, लाख ते प्रजिमा 26 ला मिळणारा रस्ता. प्रजिमा 26 ते वाघापूर, कनकापूर, ओझर बुद्रुक ते शेडगाव, आश्‍वी खुर्द रस्ता.
कोपरगाव तालुका- नाशिक जिल्हा हद्द तेपोहगाव बुद्रुक, राज्यमार्ग 64, डोर्‍हाळे, कनकुरी, शिर्डी त प्ररामा 8ला मिळणरा मार्ग (इजिमा9) व चास, मंजुर, वेळापूर, कोळगाव थडी, कुंभारी, घारी, चांदेकसारे, पोहेगाव, सावळीविहीर, वारी ते प्ररामा 12ला मिळणारा मार्ग. प्रजिमा 4 पासून ब्राम्हणगाव, टाकळी, कोपरगाव, कोकमठाण, सडे, शिंगवे, पिंपळवाडी, वाकळी, दिघी, श्रीरामपूर ते रामा 50 रस्ता.

LEAVE A REPLY

*