Friday, April 26, 2024
Homeनाशिकजिल्ह्याला 393 कोटी 62 लाखांचे अनुदान प्राप्त; अवकाळी नूकसान : साडेपाच लाख...

जिल्ह्याला 393 कोटी 62 लाखांचे अनुदान प्राप्त; अवकाळी नूकसान : साडेपाच लाख शेतकर्‍यांना मदत

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील अवकाळी नूकसानग्रस्त शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असून दुसर्‍या टप्प्यातील 393 कोटी 62 लाख 45 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. पहिल्या टप्प्यात 181 कोटी 50 लाखांची मदत प्राप्त झालेली आहे. त्यातून जवळपास अडीच लाख शेतकर्‍यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्यात आली.

- Advertisement -

ऑक्टोंबर -नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने जिल्ह्यात द्राक्षबागांसह मका, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कडधान्ये, कांदा आदी पिके उध्द्वस्त झाली. जिल्ह्यातील सहा लाख 47 हजार 315 हेक्टर क्षेत्राचे नूकसान झाले. त्यापैकी जिरायत क्षेत्राचे चार लाख 9 हजार हेक्टरवरील पिके आडवी झाली. 5 लाख 53 हजार 484 शेतकरी बाधित झाले. बागायती पिकाचे एक हजार 361 गावांमध्ये नूकसान झाले. 2 लाख 30 हजार 77 शेतकर्‍यांना त्याचा फटका बसला.

बहुवार्षिक फळपिकांची 1215 गावे व 1 लाख 4 हजार 365 शेतकरी बाधित असून, 81 हजार 270 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे 573 कोटी 4 लाख 92 हजार मदत निधीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार शासनाच्या महसूल व वन विभागाने पहिल्या टप्प्यातील अनुदान दिल्यानंतर आता दुसर्‍या टप्यात उर्वरित सर्व 396 कोटी 62 कोटी 45 हजारांचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले आहे.

जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतीपिकांसाठी 8 हजार प्रति हेक्टरी, तर बहुवार्षिक पिकांसाठी 18 हजार रुपये प्रतिहेक्टरी वाटप केली जाणार आहेत. बाधित शेतकर्‍यांच्या बँक बचत खात्यात ही मदत जमा केली जाणार आहे. जिल्हा व इतर बँकेने कोणत्याही प्रकारची कर्ज वसुली करू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या