अनैतिक व्यवसाय करणाऱ्या त्र्यंबकेश्वरजवळील हॉटेल दी-बॉसवर पोलिसांचा छापा

0

नाशिक, ता. ९ : नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील खंबाळे  परिसरातील हॉटेल दी-बॉसवर ग्रामीण पोलिसांनी आज छापा टाकून तेथील अवैधपणे सुरू असलेला देहव्यापाऱ उघडकीस आणला.

याप्रकरणी रवी काशिनाथ शिंदे ( ३६, कामगार नगर, सातपूर) आणि राजीव रामदास पाटील (वय. ४१, रा. शिंदे, नाशिक) यांना ताब्यात घेऊन त्यांचेवरत्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात पिटाअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच या ठिकाणाहून तीन सज्ञान मुलींची सुटकाही पोलिसांनी केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे, ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकातील सपोनि जालिंदर पळे यांनी अचानक या ठिकाणी छापा टाकला. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

याशिवाय त्र्यंबक शहर व परिसरातील विविध पर्यटनस्थळांवरील २३ टवाळखोरांवरही कारवाई करण्यात आली. या पुढेही ही कारवाई सुरू राहणार आहे.

दरम्यान त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधाकर मांडवकर यांची तातडीने आज पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*