जिल्हा नियोजनसाठी इच्छुक वाढल्याने अडचण

0

निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा सर्वच पक्षाचा सूर

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त असणार्‍या 36 जागांसाठी येत्या 28 ऑगस्टला मतदान होणार आहे. जिल्हा परिषद मतदारसंघातील रिक्त असणार्‍या 32 जागांसाठी अचानक इच्छुकांची संख्या वाढल्याने नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. सर्वच पक्षांनी कोट्यापेक्षा अधिक अर्ज भरल्याने जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी झाली आहे.

 

 

मात्र, असे असले तरी निवडणूक बिनविरोध करण्याचा सूर सर्वपक्षाकडून आवळण्यात आला आहे.

 

 

जिल्हा नियोजनच्या जिल्हा परिषद मतदारसंघातील 32 जागांसाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमधील इच्छुकांनी मोठ्या संख्याने उमदेवारी अर्ज दाखल केलेले आहे. 32 जागांसाठी सर्व पक्ष मिळून 47 उमदेवारी अर्ज दाखल झाले असून यासह काँग्रेसच्या दोघांनी तर भाजपाच्या एका महिला सदस्यांनी दोन प्रवर्गातून स्वतंत्रपणे उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे जिल्हा नियोजन समितीसाठी राजकीय रंगत वाढली आहे.

 

 

जिल्हा नियोजनच्या एका सदस्यासाठी 2.18 असे जिल्हा परिषद सदस्यांचे प्रमाण आहे. उदाहरणार्थ काँग्रेसचे 24 सदस्य असल्यास त्यांचे 10 सदस्यांना जिल्हा नियोजन समितीत कोठा मिळणार आहे. याप्रमाणे सदस्य बळानुसार कोठा ठरलेला असतांना शेतकरी क्रांतीपक्ष वगळता अन्य सर्वच पक्षाने जादा अर्ज भरत एकमेंंकांवर दबाब तंत्र अवलंबले आहे. यामुळे नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध होणार की मतदान होणार यासाठी दहा दिवसांची वाट पाहवी लागणार आहे.

 

 

नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी 14 तारखेपर्यंत माघारीसाठी मुदत आहे. या काळात सर्व पक्षाचे सदस्य, प्रतोद आणि नेते एकत्र बसून ही निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न करणार असल्याचा सूर सर्वच पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी आवळला आहे. जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असणार्‍या काँग्रेसच्या वाट्याला 10 जागा असून यातही विखे-थोरात यांच्या सदस्य बळानुसार विखे यांच्या वाट्याला 6 तर थोरात यांच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत. मात्र, विखे गटाकडून हा फॉर्म्युला 7-3 असा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

 

 

असे भरले गेले उमेदवारी अर्ज
काँग्रेस 15 (दोन ठिकाणी डबल अर्ज), राष्ट्रवादी 10 अर्ज, भाजप 11 अर्ज (एका ठिकाणी डबल अर्ज), सेना 5 अर्ज, क्रांतीकारी शेतकरी पक्ष 2 अर्ज, महाआघाडी 2 अर्ज, कम्युनिष्ठ 1 अर्ज आणि जनशक्ती 1 अर्ज यांचा समावेश आहे.

 

काँग्रेसचे कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे यांचा दोन मतदारसंघातून अर्ज असून यासह मिलींद कानवडे आणि भाजपा सुनिता भांगरे यांचा दोन मतदारसंघातून अर्ज दाखल करण्यात आला आहे. समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांनी नियोजन समितीच्या निवडणुकीतून आर्श्‍चयकारक माघार घेतली आहे.

 

 

नियोजन समितीची निवडणुक बिनविरोध न झाल्यास कोठ्यानूसार त्यात्या पक्षाचे सदस्य निवडूण येणार आहेत. यामुळे या ठिकाणी सर्वांनी एकत्र बसून चर्चा करून निर्णय घ्यावा, असे सर्व पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे नियोजन समितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनुसूचित जाती मतदारसंघातून उमेदवार देता आला नाही. यामुळे या ठिकाणी भाजपचे दोन सदस्य बिनविरोध होणार आहे. याची अधिकृत घोषणा माघारीनंतर होणार आहे.

LEAVE A REPLY

*