Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जिल्हा नियोजन समिती होणार ‘पेपरलेस’

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकसह राज्यातील 36 जिल्हा नियोजन समित्या लवकरच पेपरलेस होणार आहेत. डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने राज्याने हे महत्त्वाचे पाऊल उचललेअसून इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफिस ऑटोमेशन सिस्टिम(आयपीएएस)च्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे.
ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन्स या कंपनीने आयपीएएसच्या माध्यमातून, डीपीसींना पेपरलेस होण्यासाठी कार्यप्रणाली उपलब्ध करून दिली आहे. पत्र, प्रस्ताव, कामकाज, निधी वाटप तसेच डिपीडीसींच्या योजनांची कार्यक्षम अमंलबजावणीसाठी काम सुरू असून राज्यातील स्मार्ट सिटी उभारण्यासाठीचे नियोजन डीपीसी अंतर्गत होत आहे. प्रकल्प नियोजन करण्यासाठी तसेच या प्रणालीचा वापर कशापद्धतीने करावा, याचे प्रशिक्षण 2019-20 मध्ये 36 जिल्ह्यांत दिले जात आहे.

सध्या ही कार्यप्रणाली सुरळीत सुरू असून, नव्या आर्थिक वर्षात अर्थात एप्रिल 2020 पासून 100 टक्के पेपरलेस काम चालणार आहे. आयपीएएसच्या माध्यमातून डीपीसीच्या सुमारे 530 योजना डिजिटल स्वरुपात रुपांतरित झाल्या असून, जनतेला मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे. आयपीएएसच्या माध्यमातून राज्यातील सर्व सचिव कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा अधिकारी कार्यालये जोडली गेली आहे. त्यासाठी क्लाऊडबेस अ‍ॅप तयार करण्यात आले असून, त्याचे प्रशिक्षणही यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. यासाठी 120 डेव्हलपर्स टूल्सचा वापर केला जाणार असून, प्रशासकीय कामाकाजात गतिमानता येण्यासोबतच पारदर्शकता येणार आहे.

प्रशासकीय कामाकाजासाठी आवश्यक असणार्‍या सर्व बाबी विचारात घेऊन सरकारी नियमावलीचे पालन करत, हे अ‍ॅॅप तयार करण्यात आले आहे. कागदपत्रांचा संग्रह आणि दस्तावेजांची पुनर्प्राप्तीचे संपूर्ण नियोजन ईएसडीएसच्या तळोजा, नाशिक, बंगळुरु येथील डेटासेंटरमध्ये सुरक्षित पद्धतीने येथेच संग्रहितही केली जाणार आहे. त्यामुळे नस्ती(फाईल) गहाळ किंवा कागदपत्र सापडत नसल्याच्या तक्रारीच यापुढच्या काळात संपुष्टात येतील. एकेका योजनेचे कालबद्ध नियोजन, निधी व्यवस्थापन, शासकीय, आमदार, खासदारच्या निधीचे वाटप, उपलब्धता यासह कामाचे मॅपिंग आणि प्रगतीचे ट्रॅकिंग करणे यामुळे सहज शक्य आहे. याशिवाय टेबल रेंगाळत राहणार्‍या फाईलही ऑनलाईन एका टेबलहून दुसर्‍या टेबलकडे एका क्लीकवर वर्ग केल्या जाणार आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!