जिल्हा नियोजन समिती निवडणूक ; 32 इच्छुकांनी नेले 116 अर्ज, दुसरा दिवस निरंक

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा नियोजन समितीच्या 36 जागेसाठी निवडणूकीसाठी दुसर्‍या दिवशी एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झाला नाही.मात्र,कालअखेर पर्यत एकूण 32 इच्छुकांनी116 अर्ज नेले आहे. झेडपी अध्यक्षा शालिनीताई विखे, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नागवडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फंटागरे आदी पदाधिकार्‍यांच्या नावे अर्ज गेले आहेत.

जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक 95, नगर परिषद 14 व नगरपंचायतीसाठी 7 अर्ज नेण्यात आले आहे.राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य दिनेश बर्डे यांनी 18 सदस्यांसाठी प्रत्येकी चार याप्रमाणे सर्वाधिक 72 अर्ज नेण्यात आले आहेत. यामध्ये राजेश परजणे, पुष्पा वराळ, रोहिणी निघुते,शशिकला पाटील, अनुराधा नागवडे, अनिता हराळ, आशाताई दिघे, प्रताप शेळेके, शालिनीताई विखे, कविता लहारे, शिवाजी गाडे, जनाबाई पैसे, मंगला पवार, शाम माळी, महेश सुर्यंवशी, संगिता गांगुर्डे व हर्षदा काकडे आदींच्या नावे प्रत्येकी चार अर्ज नेण्यात आले आहे.

तर, प्रतिभा ढाकणे (4), पंचशिला गिरमकर (3), अरुण कुरकुटे यांनी अजय फंटागरे, कानवडे मिलिंद, सिताराम राऊत, रामहरी कोतोरे, भाऊसाहेब कुटे यांच्या नावे प्रत्येक 1 असे एकूण सात अर्ज नेले आहे.अशोक शेटे यांनी मीरा शेटे, प्रताप शेळके, अनुराधा नागवडे, शांताबाई खैरे आदींच्या नावे चार अर्ज नेले आहेत. महेंद्र विघ्ने यांनी हर्षदा काकडे यांच्या नावे 3 व मुकुंद अभंग यांनी दत्तात्रय काळे यांच्या नावे एक अर्ज दाखल केला आहे.जिल्हा परिषद (ग्रामीण निर्वाण क्षेत्र) एकूण 95 अर्ज गेले आहे.

नगर परिषदेसाठी एकूण 14 अर्ज नेले आहे. यामध्ये शारदा गिधाडे (2), सोहम खैरे (2), प्रसाद आव्हाड (1), अभय शेळके (4), प्रणिती चव्हाण (3), सागर लोंढे (1) आदी.तर, नगरपंचायतीसाठी दादा सोनवने व सौ.भांगरे यांनी एकूण 7 अर्ज नेले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली आहे. अर्ज सादर करण्याची मुदत 4 ऑगस्ट दुपारी 3 पर्यंत आहे.

LEAVE A REPLY

*