जिल्हा नियोजन समिती निवडणूक; 7 जागा बिनविरोध, 25 जागांसाठी रंगत

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त असणार्‍या 36 जागासाठी शुक्रवारी उमदेवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली. सात जागांसाठी केवळ एक एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्‍चित आहे. यासंदर्भातील घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे

. त्यामुळे नियोजन समितीच्या 25 जागांसाठी 75 जणांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. आता उमदेवारी अर्ज माघारीसाठी दहा दिवसांची मुदत असून या काळात काय घडामोडी घडतात नि कोणकोण माघार घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा नियोजन समितीसाठी निवडणुक होण्यापूर्वीच भाजपला 4, काँग्रेसला 2 आणि राष्ट्रवादीला एका ठिकाणी खाते खोलण्याची संधी मिळाल आहे.
28 ऑगस्टला होणार्‍या नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी शुक्रवार (दि.4) दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत होती.

यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा आवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांसह राजकीय नेते आणि कार्यकर्त्यासह गर्दीने फुलून गेला होता. जिल्हा परिषद (ग्रामीण निर्वाचन क्षेत्र) 32 जागांसाठी 53 अर्ज दाखल झाले आहे. यामध्ये तीन सदस्यांनी दोन प्रवर्गातून वेगवेगळे अर्ज दाखल केले आहेत.

यात सर्वसाधारण मतदारसंघासाठी सुधाकर दंडवते, राजेश परजणे (कोपरगाव), पुष्पा वराळ (पारनेर), गुलाब तनपुरे (कर्जत), माधवराव लामखडे, शरदराव झोडगे (नगर), हर्षदा काकडे (शेवगाव), प्रभावती ढाकणे, राहुल राजळे (पाथर्डी), शरद नवले (श्रीरामपूर), जालिंदर वाकचौरे (अकोले), भाऊसाहेब कुटे, सीताराम राऊत, अजय फटागंरे, मिलिंद कानवडे (संगमनेर).

सर्वसाधारण महिला- विमल आगवन (कोपरगाव), आशाताई दिघे (श्रीरामपूर), रोहिनी निघुते,मीरा शेटे (संगमनेर), राजश्रीताई घुले (शेवगाव), सुप्रिया पाटील (पारनेर), सुषमा दराडे, सुनिता भांगरे (अकोले), ताराबाई पंदरकर, अनुराधा नागवडे, पंचशिला गिरमकर (श्रीगोंदा).

नागरिकांचा मागास प्रवर्ग- शालिनीताई विखे, कविता लहारे (राहाता), तेजश्री लंघे (नेवासा), ललिता शिरसाठ, संध्या आठरे (पाथर्डी), नागरिकांचा मागासप्रवर्ग पुरुष-सुनिल गडाख (नेवासा), शिवाजी गाडे (राहुरी), संदेश कार्ले (नगर), काशिनाथ दाते (पारनेर), दत्तात्रय काळे (नेवासा), रामहरी कोतोरे, अजय फटागंरे, प्रताप शेळके, मिलिंद कानवडे (संगमनेर) आणि अनिल कराळे (पाथर्डी). अनुसूचित जमाती- दिनेश बर्डे (राहाता) सुनिता भांगरे (अकोले). अनुसूचित जाती- कांतिलाल घोडके (कर्जत), सोमीनाथ पाचरणे (जामखेड), अनुसूचित जाती महिला- सुरेखा साळवे (नेवासा), वंदना लोखंडे (जामखेड), संगिता गांगुर्डे (श्रीरामपूर) आदी 51 सदस्यांनी अर्ज दाखल केले आहे.

नगर परिषद/नगरपालिका (लहान निर्वाचन क्षेत्र)- सर्वसाधारण महिला- सुहासिनी गुंजाळ (संगमनेर), शारदा गिधाड ( दोन अर्ज,राहाता), उषाताई तनपुरे (राहुरी), संगिता मखरे, छाया गोरे (श्रीगोंदा), मंगल कोकाटे (शेवगाव) आदी 6 महिलांनी 7 अर्ज दाखल केले आहे. अनुसूचित जाती प्रवर्ग- संतोष कांबळे (दोन अर्ज, श्रीरामपूर), राधा साळवे (राहुरी), प्रणिती चव्हाण, चंद्रकला डोळस (श्रीरामपूर) एकूण 6 जणांनी सात अर्ज दाखले केले.

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-स्नेहल खोरे (श्रीरामपूर), सोनाली शिंदे (संगमनेर), अनिता पोपळघट (राहुरी), डॉ.मंगल गाडेकर (राहाता) नगर पंचायत सोनाली नाईकवाडी (अकोले), निर्मला सांगळे (नेवासा), सिमा मापारी (नेवासा), पुजा म्हेत्रे (कर्जत), वृषाली पाटील (कर्जत), संगिता औटी (पारनेर) आदी 6 जणांनी अर्ज दाखल केले आहे.पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भानुदास पालवे यांच्याकडे अर्ज दाखल केले.यावेळी काँग्रसचे बाबासाहेब दिघे, सेनेचे संदेश कार्ले, अनिल कराळे, भाजपचे जालिंदर वाकचौरे आदींनी आपल्या पक्षातील सदस्यांची अर्ज भरून घेण्यासाठी धावपळ केली.

386 मतदार
जिल्हा परिषद (ग्रामीण निर्वाचन क्षेत्र) 72, नगर परिषद/नगरपालिका (लहान निर्वाचन क्षेत्र) 229 व नगर पंचायत 85 असे एकूण 386 मतदार आहेत.

हे उमेदवार बिनविरोध : नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला) या ठिकाणी पाच महिलांसाठी जागा राखीव होत्या. त्या ठिकाणी पाच महिलांचे उमदेवारी अर्ज दाखल झाल्याने या पाचही जागा बिनविरोध होणार आहेत. यात विद्यमान अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्यासह कविता लहारे (काँग्रेस) तेजश्री लंघे (राष्ट्रवादी), ललीता शिरसाठ आणि संध्या आठरे (भाजप) यांचा समावेश आहे. तर अनुसूचित जाती प्रवर्गातून पुरूषांच्या दोन राखीव जागेसाठी भाजपाचे कांतीलाल घोडके आणि सोमीनाथ पाचरणे यांचे उमदेवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे या सात सदस्यांची जिल्हा नियोजनासाठी जवळपास बिनविरोध निवड झाली असून येत्या 14 तारखेला माघारीच्या दिवशी या निवडीवर शिक्कामोर्तब होणार असल्याची निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*