जिल्ह्यात ठिकठिकाणी इफ्तार पार्टी

0

जातीय सलोखा, सामाजिक एकता व बंधुभावची शिकवण

पवित्र रमजान महिन्याची सांगता आज ईद साजरी करुन होत आहे. या रमजानच्या महिण्यात मुस्लिम बांधवांनी भक्तिभावाने अल्लाहच्या आदेशांचे पालन करत केलेल्या रोजा सोडवण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदू-मुस्लिम समाजामध्ये सामाजिक एकता, जातीय सलोखा रहावा व बंधूभावासाठी प्रार्थना करण्यात आली.

श्रीरामपूर(वार्ताहर) – रमजान महिना हा आनंददायी व प्रेरणा देणारा आहे. हा सण एकत्रित साजरा केल्याने आनंद द्विगुणीत होतो. त्यातून समता व बंधुभाव निर्माण होते. विविध धर्म, पंथ ही आपली संस्कृती आहे. तिचे जतन करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले.
जामा मस्जिद येथे रमजाननिमित्त महाराष्ट्र कृषक समाजच्यावतीने व नगराध्यक्षा अनुराधा आदिक परिवाराच्यावतीने इफ्तार पार्टीत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार भाऊसाहेब कांबळे होते. यावेळी मौलाना इमदाद अली, मौलाना इशराद, जलीलखान पठाण, नगरसेवक अंजूम शेख, शकूर शेख, याकूब बागवान, नजीर मुलाणी, रमजान शहा, अब्बू कुरेशी, नगरसेवक तारांचद रणदिवे, कलीम कुरेशी, अ‍ॅड. सतोष कांबळे, श्यामलिंग शिंदे, बाळासाहेब गांगड, प्रकाश ढोकणे, जितेद्र छाजेड, राम टेकावडे, नगरसेविका जयश्री शेळके,
मुख्याधिकारी सुंमत मोरे, केतन खोरे, दीपक चव्हाण, अल्तमेश पटेल, कारभारी बडाख, प्रकाश पाऊलबुधेे, भाऊ डाकले, अविनाश जगताप, हेमंत चौधरी, अनंत पतंगे, विजय शिंदे, चंद्रकांत संगम, पंडितराव बोंबले, डॉ. बापूसाहेब आदिक, डॉ. रवींद्र जगधने यांच्यासह सलीम शेख, लकी सेठी, योगेश जाधव, भीम शक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, जयंत चौधरी, हंसराज आदिक,
अ‍ॅड. बाबा शेख, सरवरअली सय्यद, इम्रान शेख, आरीफ बागवान, रणजीत पाटील, विजय शेलार, विराज भोसले, कैलास बोरुडे, राजू शेट्टी, बशीर बागवान, फिरोज पोपटिया, दीपक वमने, बाळासाहेब भोसले, भगवान वलेशा, फैयाज बागवान, विजय डावखर, सुनील थोरात, सलीम दस्तगीर शेख, रोहित शिंदे, सुभाष आदिक, शकील बागवान, राजेद्र पानसरे, सुधीर बोरावके,
भगवान आदिक, भाऊसाहेब वाघ, मंगलसिंग साळुंके, विलास ठोबरे, तौफिक शेख, गनी शेख, बापूसाहेब पटारे, बाबासाहेब खोसरे, डॉ. वसंत देवकर, रज्जाक पठाण, सूर्यकांत डावखर, अर्चना पानसरे, डॉ. सुधा कांबळे, डॉ. सौ. राऊत, एस. के. खान, साजिद मिर्झा, रईस जहागीरदार, तन्वीर मौलाना, अमजद पठाण, आदित्य आदिक, अविनाश पोहेकर आदी उपस्थित होते.
जमियत उलेमा-ए-हिंद, बेलापूर आणि बेलापूर पोलीस स्टेशनच्यावतीने रमजान निमित्त मुस्लिम बांधवांसाठी आयोजित इफ्तार पार्टी समारंभात अप्पर पोलीस अधीक्षकांचा सत्कार करताना मान्यवर.

बेलापूर (वार्ताहर) – प्रत्येक धर्म श्रेष्ठ असून त्यांच्या तत्त्वज्ञानाची देवाण घेवाण व्हावी, आणि त्यातून सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन हा अतिशय स्थूत्य उपक्रम असून गावाची ही प्रतिमा यापुढेही कायम ठेवावी असे आवाहन श्रीरामपूर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक रोहिदास पवार यांनी केले,
जमियत उलेमा-ए-हिंद, बेलापूर आणि बेलापूर पोलीस स्टेशन यांच्यावतीने रमजान निमित्त मुस्लिम बांधवांसाठी आयोजित इफ्तार पार्टीत मार्गदर्शन करून शुभेच्छा देताना ते बोलत होते.

पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार लोखंडे, सरपंच भरत साळुंके, झेडपी सदस्य शरद नवले, पंचायत समिती सदस्य अरुण पा, नाईक, बाजार समिती संचालक सुधीर नवले, रवींद्र खटोड, अभिषेक खंडागळे, सार्वमतचे उपसंपादक राजेंद्र बोरसे, पत्रकार प्रा, ज्ञानेश गवले, आलम शेख, संयोजक अकबर शेख आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक देविदास देसाई यांनी आभार केले. हवालदार महादेव गाढे यांनी आभार मानले.

यावेळी बाबूलाल पठाण, हैदरभाई सय्यद, दिलीप सोनवणे, शांतिलाल हिरण, प्रशांत लड्डा, पोलीस पाटील अशोक प्रधान, युवराज जोशी, शिवाजी भोसले, प्रशांत शहाणे, राजेंद्र ओहोळ, लहानुभाऊ नागले, अशोक गवते, विवेक वाबळे, भास्कर बंगाळ, प्रा. अशोक बडदे, पत्रकार मारुती राशीनकर, दिलीप दायमा, नवनाथ कुताळ, फिरोज दारूवाला, अजिम शेख, पो, कॉ. अतुल लोटके, राहुल सोळुंके, अर्जुन पोकळे, मनोज श्रीगोड, फिरोज दारूवाला आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर – मुस्लीम समाजाच्या पवित्र रमजान उपवासाला अतिशय महत्त्व आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत महिला व पुरुष रमजान महिन्यात उपवास ठेवून पुण्य मिळविण्याचे काम करतात. अतिशय कडक उपवास असतानाही मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव उपवास (रोजा) ठेवतात ही बाब उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.

श्रीरामपूर विकास महाआघाडीच्यावतीने सय्यदबाबा दरगाह येथील जामा मस्जीद हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीच्यावेळी मुरकुटे बोलत होते.
यावेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, नगरसेवक अंजूम शेख, मुळा-प्रवराचे संचालक जलिलखान पठाण, रमजानी मामू शेख, पक्षप्रतोद भारती कांबळे, मुख्याधिकारी सुमंत मोरे, नगरसेवक राजेंद्र पवार, बाळासाहेब गांगड, श्यामलिंग शिंदे, जितेंद्र छाजेड, नगरसेविका वैशाली चव्हाण, विजय शिंदे, चंद्रकांत सगम, अशोक बागुल, अशोक कारखान्याचे संचालक लाल पटेल, अशोक बँकेचे संचालक नाना पाटील, हाजी मुक्तार खान, इम्रान शेख, अल्तमश पटेल, रईस जहागीरदार, सरवरअली सय्यद, निसार कुरेशी, सिकंदर पठाण, शाहिद खान, साजिद मिर्झा, कलीम कुरेशी आदींसह मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील जामा मस्जीदमध्ये तुलशी रामायणाचे गाढे अभ्यासक रामराव महाराज ढोक यांच्यामार्फत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या 15 वर्षांपासून रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी येथील जामा मस्जिदमध्ये इफ्तार पार्टी देत आहेत. यावेळी मौलाना दाऊद इब्राहीम, अजिज इनामदार, विजय सीताराम ढोकचौळे, माजी सरपंच भागवत नाना ढोकचौळे, पत्रकार अशोक अभंग यांनी मनोगत व्यक्त केले. इफ्तार पार्टीस गणेश कारखान्याचे संचालक अण्णासाहेब सदाफळ, दिलीप रंधे, हरिभाऊ ढोकचौळे, उपसरपंच दिनकर सदाफळ, माजी उपसरपंच सुकदेव सोडणार, सोसायटीचे माजी अध्यक्ष रावसाहेब ढोकचौळे, जयसिंगराव ढोकचौळे, पोलीस पाटील गोरक्षनाथ सोडणार, दत्तात्रय सदाफळ, मनोज नगरकर, सोसायटी अध्यक्ष सुनील ढोकचौळे, गणेश उफाडे, महेश ढोकचौळे, माजी अध्यक्ष संजय बोरकर, विठ्ठलराव सदाफळ आदीसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.

खंडाळा (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील जामा मज्जीदमध्ये आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत सरपंच, उपसरपंच यांच्यावतीने इफ्तार पार्टी झाली. यावेळी सरपंच संगीता विजय ढोकचौळे, उपसरपंच दिनकर सदाफळ यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीस ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, नवनाथ ढोकचौळे, अनिल ढोकचौळे, गणेश कारखान्याचे संचालक अण्णासाहेब सदाफळ, राधाकिसन बोरकर, रामदास म्हसे, संदीप विधावे, अमोल गुंजाळ, महेश मरकडे, पोलीस पाटील गोरक्षनाथ सोडणार, जयसिंगराव ढोकचौळे, आबा डेंगळे, खंडेराव सदाफळ, विजय ढोकचौळे, सुकदेव सोडणार, शिवाजीराव पाचोरे, कुंदन माळी, दशरथ गांगुर्डे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

राहुरी (तालुका प्रतिनिधी)- राहुरी शहर व तालुक्याला सर्वधर्मसमभावाची प्राचीन परंपरा आहे. तीच परंपरा यापुढेही चालू ठेवून राहुरी तालुका विकासाच्या वाटेने पुढे नेऊ, एकीकडे वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठुरायाच्या जयघोषात श्रीक्षेत्र पंढरीला पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी दिंडी सोहळ्याने जात असताना याच महिन्यात रमजानसारखा पवित्र सण साजरा होत आहे. हा दुर्मिळ धार्मिक योग जुळून आला असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी केले.
राहुरी येथील विकास मंडळाच्या कार्यालयात शहरातील सर्व मुस्लीम बांधवांना पवित्र रमजानच्या रोजाचे औचित्य साधून चाचा तनपुरे मित्र मंडळाच्या वतीने इफ्तार पार्टी देण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासात मुस्लीम बांधवांचा मोलाचा वाटा आहे. शहरातील जातीय सलोखा राखण्याचे काम या समाजाने केले आहे. असे सांगत रावसाहेब चाचा तनपुरे यांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास डॉ. धनंजय मेहेत्रे, डॉ. जयंत कुलकर्णी, राहुरी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शिवाजीराव सोनवणे, विजयराव डौले, रुद्राक्ष युवामंचाचे संस्थापक अध्यक्ष नितीनराव तनपुरे, ज्ञानेश्‍वर पोपळघट, सोन्याबापू जगधने, शहाजी जाधव-ठाकूर, अण्णासाहेब शेटे, सुभाष वराळे, बाळासाहेब जाधव, योगेश देशमुख, सुरेश भुजाडी, हारून शेख, मुजफ्फर पठाण, हान्नूभाई, राजू बॅटरीवाला, गालिबभाई दारूवाला, डॉ. सय्यद, अजीज शेख, डॉ. जाकीर सय्यद, दादाभाई देशमुख, हाजीसाहब नूर, तात्या काशिद, अतिक बागवान, दिलीप राका, अनिल माळवदे, अ‍ॅड. अशोक तनपुरे, अफनान आतार, प्रतीक तनपुरे आदी उपस्थित होते.

हनमंतगाव (वार्ताहर) – राहाता तालुक्यातील हनमंतगाव येथे मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजाननिमित्त सर्वधर्मीय नागरिकांसाठी येथील मशिदीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कासम शब्बीर, उपाध्यक्ष पापा शेख, मुनीर, हुसेन, जाबीर कासम, मुनीर हुसेन, राजू बाबूलाल, कयूम इमाम, अजिज बक्षू, अज्जू मुनीर, शोएब शेखलाल, शाबीद अजीज, अरबाज, इन्नूस पापा, शकील गुलाब, इम्राम बाबूलाल आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते. तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बापूसाहेब घोलप, विद्यमान संचालक राजेंद्र घोलप, उत्तमराव घोलप, भागवतराव कानडे, संजय अनाप, रामभाऊ कानडे, हनमंतगाव सोसायटीचे संचालक विनायक अनाप, आरपीआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोरक्षनाथ ब्राह्मणे, बापूसाहेब अनाप आदी उपस्थित होते.
डॉ. पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र घोलप यांनी हनमंतगावात सर्व जातिधर्मात वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने नांदत आहेत, हीच एकता व भाईचारा टिकवून ठेवावा, असे आवाहन केले.

निघोज (वार्ताहर) – पारनेर तालुक्यातील निघोजमध्ये जातीय, राजकीय, सामाजिक सलोख्याचे वातावरण प्रस्थापित करावे, असे आवाहन पारनेरचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी केले.
पारनेर पोलीस प्रशासन व निघोज ग्रामपंचायतीच्यावतीने जामा मस्जिदमध्ये इफ्तार पार्टी व शांतता समितीच्या बैठकीत पोनि. गाडे बोलत होते.
यावेळी माजी सरपंच संदीप वराळ यांच्या हत्या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. हत्येनंतर निघोजची शांतता भंग होत आहे. प्रत्येक गुन्ह्याचा तपास जलद गतीने सुरू आहे. चौकशीअंती सर्व प्रकरणाचा छडा लागणार आहे. त्यामुळे निघोजची शांतता भंग होणार नाही याकडे ग्रामस्थांनी लक्ष ठेवावे. असे आवाहन पोनि. गाडे यांनी केले.
यावेळी सरपंच ठकाराम लंके, उपसरपंच उमेश सोनवणे, अरुण वराळ, शिवाजी वरखडे, बाळासाहेब दिघे, ग्रामपंचायत सदस्य सचिन वराळ, भास्कर वराळ, मंगेश वराळ, रोहिदास लामखडे, ज्ञानेश्वर लंके, भिमराव लामखडे, मंगेश लाळगे, विठ्ठलराव कवाद, दत्ताजी गुंड, शिवाजी लंके, दत्ता कवाद, मोहन खराडे, तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर कवाद, माउली वरखडे, निवृत्ती वरखडे, याकूब तांबोळी, साजीद तांबोळी, फिरोज शेख, इम्रान मोमीन, एस. एस. निकम, एस. एस. कावडे, ए. एस. फसले, के. आर. काळे उपस्थित होते. सूत्रसंचलन हारुन तांबोळी व अनंत वरखडे यांनी केले. समीर हवालदार यांनी आभार मानले.

कोपरगाव (प्रतिनिधी) – मुस्लीम बांधव रमजान महिन्यात करीत असलेल्या खडतर उपवासामुळे आचार व विचारआमध्ये अतिशय चांगले बदल होतात. हे उपवास अल्लाची अमूल्य देणगी असून हे खडतर उपवास केल्यामुळे मन व शरीराची शुद्धी होते असे प्रतिपादन कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अशोक कुसाळकर यांनी केले.
कोळपेवाडी येथील जामा मस्जिदमध्ये मुस्लीम बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टी कार्यक्रमात ते बोलत होते. कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे यांच्या मार्गदशनाखाली दरवर्षी रमजान महिन्यात कोपरगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये दावत ए इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. सामाजिक एकोपा जपला जावा हा त्यामागे एकमेव उद्देश असतो. हा सामाजिक एकोपा जपण्याची परंपरा कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनने याही वर्षी जपली.
यावेळी पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे, पंचायत समिती सदस्य अर्जुनराव काळे, माजी जिल्हा परिषद बाबासाहेब कोळपे, सरपंच जनार्दन कोळपे, शहाजापूरचे पोलीस पाटील इंद्रभान ढोमसे, हौशीराम कोळपे, डॉ. आय. के. सय्यद, मौलाना मुज्जमिल, शकील पटेल, शब्बीर शेख, राजूभाई टेलर, अजित पटेल, रज्जाकभाई कुरेशी, बिलाल बागवान आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*