जिल्ह्यात नोटाबंदी वर्षपूर्तिनिमित्त ‘काळा दिवस’

0

शेवगाव, पाथर्डी, पारनेर, जामखेड, कर्जत तहसीलदारांना निवेदने; निषेधाच्या घोषणा

केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी चलनातील पाचशे व हजार रुपयांची नोटबंदी केली होती. या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाले असून या वर्षपूर्तीनिमित्त शेवगाव, पारनेर, पाथर्डी, जामखेड व कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन व बैठा सत्याग्रह करून ‘काळा दिवस’ म्हणून पाळला. शासनाच्या नोटाबंदी निर्णयाचा निषेध करत निषेधाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी नोटबंदी निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाला झालेल्या त्रासाबद्दल अनेकांनी भावना व्यक्त करून नोटाबंदी निर्णय चुकीचा ठरल्याच्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी शासनाच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या.

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी अचानक नोटाबंदी केली. या नोटाबंदीच्या वर्षपूर्तिनिमित्त निषेध व धिक्कार करण्यासाठी शेवगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निषेधाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी बाजार समितीचे सभापती संजय कोळगे, दिलीपराव लांडे, काकासाहेब नरवडे, अरुण लांडे, ताहेर पटेल, बाजार समितीचे उपसभापती रतन मगर, हनुमान पातकळ, बप्पासाहेब लांडे, कृष्णा ढोरकुले, विष्णुपंत बोडखे, आयुब पठाण, मारुतराव थोरात, नगरसेवक सागर फडके, उमर शेख, शब्बीर शेख, विकास फलके, खरेदी विक्री संघाचे एकनाथ कसाळ, कैलास तिजोरे, बापुसाहेब गवळी, माणिक थोरात, पंडीत भोसले, संजय शिंदे, मंगेश थोरात आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवगाव तहसील कार्यालयाच्या मुख्य दरवाजाजवळ धरणे आंदोलन करण्यात आली. यावेळी संजय कोळगे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सरचिटणीस डॉ. मेधा कांबळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा पद्मा पाठक, युवक कार्यकर्ते नंदू मुंढे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाणे यांनी आपले मत व्यक्त करून नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध केला.

नोटाबंदीचा निर्णय देशातील सर्व घटकांना व सर्वसामान्यांना लाभ दायक ठरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला दिला होता. मात्र आज वर्ष उलटले, तरी याचे वाईट परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागत आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेचाच बोजवारा उडाला आहे. महागाई वाढली, विकासदर घसरला, बेरोजगारी वाढली, शेतमालाला भाव नाही त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले. देशात मंदीची लाट आल्याचे अर्थज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. नोटा बदलण्यासाठी धनिकांना त्रास न होता तो सर्वसामान्य माणसांना झाला. रांगेत उभे राहून जीव गमवावा लागला. परदेशातील काळे धन देशात आलेच नाही. त्यामुळे गरिबांच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्याची घोषणा गाजरच ठरली.
– संजय कोळगे (सभापती, शेवगाव बाजार समिती)

पारनेर (प्रतिनिधी) – पारनेर तालुका राष्ट्रवादीच्यावतीने नोटाबंदीचा वर्षपूर्ती दिवस ‘काळा दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दादासाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार संजय माळी यांना नोटाबंदी निर्णयाच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर बाजारपेठा उद्धवस्त झाल्या आहेत. अर्थव्यवस्था कोलमडली असून सर्वसामान्य जनतेला त्रास झालेला आहे. शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरीही उद्धवस्त झाला असून कारखानदारी बंद झाल्यामुळे तरुण बेरोजगार झाले आहेत. यामुळे या नोटाबंदीचा निर्णय चुकीचा ठरला. या निर्णयाचा राष्ट्रवादीच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. याबाबतचे निवेदन तहसील कार्यालयाला देण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, गंगाराम बेलकर, बापूसाहेब भापकर, अरुण ठाणगे, मोहन रोकडे, शंकर नगरे, दीपक नाईक, योगेश मते, सखाराम औटी आदी उपस्थित होते.

पाथर्डी (प्रतिनिधी) – भाजप सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ काल पाथर्डी तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. दरम्यान, निवेदन स्वीकारण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक चाँद मणियार व तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील तहसील कार्यलयासमोर भाजप सरकारने नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ जाहीर निषेध करत निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे, नगरसेवक बंडू बोरुडे, जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे, माजी नगरसेवक चाँद मणियार, राष्ट्रवादी युवकचे चंद्रकात मरकड, संजय डोमकावळे, चंद्रकांत भापकर, प्रा. दिगंबर गाडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा मनीषा डांभे, रत्नमाला उदमले, आरती निर्‍हाळी, योगेश वाळके आदी उपस्थित होते.
निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तहसील कार्यालयात गेले असता नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी दालनाच्या बाहेर येऊन निवेदन स्वीकारण्याची विनंती केली. मात्र नेवसे यांनी बाहेर येण्यास नकार दिला. यावरून माजी नगरसेवक चाँद मणियार व नायब तहसीलदार यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी दालनातच अधिकार्‍याविरोधात ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात करताच नेवसे यांनी नमती भूमिका घेत बाहेर येऊन निवेदन स्वीकारले व वादावर पडदा पडला.

जामखेड (प्रतिनिधी) – नोटाबंदीचा निर्णय फोल ठरला असून या निर्णयामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. सामान्य नागरिक, व्यापारी शेतकरी व नोकरदारांसह देशातील नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या निषेधार्थ जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांनी हा दिवस ‘काळा दिवस’ पाळून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी जि. प. सदस्य शहाजी राळेभात, शरद भोरे, युवक अध्यक्ष शरद शिंदे, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, नगरसेवक विकास राळेभात, पवन राळेभात, अमित जाधव, कृष्णा चव्हाण, प्रदीप पाटील, हरीभाऊ आजबे, प्रशांत राळेभात, उमर कुरेशी, प्रकाश काळे, हनुमंत मुरूमकर, अवधूत पवार, संभाजी राळेभात, कुमटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले.

कर्जत (प्रतिनिधी) – नोटाबंदी निर्णयाच्या वर्षपूर्ती दिनानिमित्त कर्जत तालुका राष्ट्रवादीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी भाजपा सरकाराच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून टाकला होता. यावेळी राजेंद्र फाळके, जि. प. माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, तालुका अध्यक्ष काकासाहेब तापकीर, जि. प. समाजकल्याणचे सभापती उमेष परहर, अ‍ॅड. सुरेश शिंदे, पं. स. सदस्य राजेंद्र गुंड, एकनाथ गांगर्डे, सरपंच वसंत कांबळे, महिला अघाडीच्या अध्यक्षा रजनी निंबोरे, देविदास गोडसे, गजेंद्र यादव, रज्जाक झारेकरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*