जिल्ह्यातील महाधन विक्रेते संमेलनासाठी रशियाला रवाना

0
अहमदनगर(प्रतिनिधी) – रशिया येथे होणार्‍या ‘आंतरराष्ट्रीय महाधन विक्रेता संमेलना’साठी अहमदनगर विभागातील 15 विक्रेते व दिपक फर्टिलायझर्सचे उपमहाव्यवस्थापक रवाना झाले आहेत.
स्मार्टकेम टेक्नॉलॉजीस् लि.ही कंपनी दिपक फर्टिलायझर्स या कंपनीची सबसिडरी कंपनी असून गेल्या 25 वर्षांपासून दर्जेदार रासायनिक खतांचे उत्पादन व वितरण करत आहे व गेल्या 6 वर्षांपासून ही कंपनी ‘आंतरराष्ट्रीय महाधन विक्रेता संमेलनाचे आयोजन करत आहे.
यावर्षी रासायनिक खतांच्या व्यवसायावरून व मेरीटच्या आधारे 15 महाधन विक्रेत्यांची रशियाला होणार्‍या संमेलनासाठी निवड करण्यात आली.
राम नारायण लाहोटी (बालाजी ट्रेडर्स, शेवगाव), संजय ललवाणी (वृषभ कृषी सेवा केंद्र प्रवरासंगम), अशोक लोखंडे (साईकृषीसेवा केंद्र, टाकळीभान), भागवत भांड (भांड पाटील अ‍ॅग्रो सर्व्हिसेस, बेलापूर), किसनराव बनकर (नॅशनल अ‍ॅग्रो केमिकल्स, मिरजगाव), अंकुश सोनलकर (सोनल अ‍ॅग्रो सेंटर, गव्हाणवाडी), शशिकांत सोमवंशी, सुरेंद्र यादवराव सोमवंशी (जवळा),
संतोष शिंदे (माऊली फर्टिलायझर्स, निघोज), सुदीप वाकळे (साईनाथ कृषी भांडार, घारगाव), संभाजीराव आरोटे (गणेश कृषीसेेवा केंद्र, कोतूळ), अक्षय शिंदे (वैशाली कृषी सेवा केंद्र, संगमनेर), मिलिंद कुलकर्णी (प्रगत कृषी सेवा केंद्र, संगमनेर), कैलास ठोळे (अ‍ॅग्रो सर्व्हिसेस प्रा. लि., कोपरगाव), कैलास वर्पे (कैलास कृषी सेवा केंद्र, कोल्हार) हे विक्रेते व दिपक फर्टिलायझर्सचे उपमहाव्यवस्थापक साहेबराव करदुरे रशियाला रवाना झाले आहेत.

 

LEAVE A REPLY

*