Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारीपदी गायकवाड

Share

संगमनेर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने राज्यभरात संघटनात्मक कामकाजामध्ये गतिमानता व सुसुत्रता आणण्यासाठी जिल्हानिहाय प्रभारींची घोषणा करण्यात आली असुन अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारीपदी नाशिकचे प्रा. ज्ञानेश्‍वर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांना 16 वर्षांपासुन काँग्रेस पक्ष संघटनात्मक कामकाजाचा अनुभव असुन ते सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आहेत. महसुलमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेनुसार अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या प्रभारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी ज्ञानेश्‍वर गायकवाड म्हणाले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व महसूलमंत्री नामदार थोरात यांनी आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्‍वास टाकत या मोठ्या कामाची जबाबदारी सोपवली असुन आपण मिळालेल्या या संधीचे निश्चितपणे सोने करु. त्यांच्या मार्गदर्शनाने व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.

प्रा. ज्ञानेश्‍वर गायकवाड यांच्या नियुक्तीबद्दल ना. थोरात, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव वामसीचंद रेड्डी, आ. डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार लहु कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके आदिंसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!