वर्षभरात 11 लाख दाखल्यांचे वाटप ; जिल्हाधिकार्‍यांची माहिती

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसेवा हक्क कायद्यातर्ंगत वर्षभरात विविध प्रकारचे एकूण 10 लाख 95 हजार दाखले वाटप करण्यात आल्याची माहिती. जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिली.

महसूल दिनानिमित्त विविध उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. दाखले वाटप करण्यात जिल्हा प्रथम तर, राज्यात व्दितीय क्रमांकावर आहे. मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियमातील काही तरतूदीरत सुधारणा करण्यात करण्यवात आलेले बदल हे नागरिकांसाठी लाभदायक आहेत.त्यांनी त्या तरदूतील सुधारणांचा लाभ घ्यावा असे आहवान जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी गोपिचंद कदम, महसुलच्या उपज्जिल्हाधिकारी साधना सावरकर, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर,तहसिलदार सुधीर पाटील आदी उपस्थित होते. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत डिजीटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉर्डनायझेशन प्रोग्राम अंतर्गत सात बारा संगणीकरण, स्कॅनिंग, आदी काम करण्यात येणार आहे.

9 तालुक्यातील काम पूर्ण –
जिल्ह्यातील तालुका अभिलेखातील जुने अभिलेख जसे 7/12 फणफार नोंदी, कडई पत्र, जन्ममृत्यू नोंदणी इत्यादी अभिलेखांचे केले जात आहे. स्कॅनिंग प्रकल्पांतर्गत नगर, पाथर्डी, राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत व जामखेड या तालुक्यातील स्कॅनिंगचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत तालुक्याचे काम 15 ऑगस्टपर्यत पूर्ण करण्याषत येणार आहे.

LEAVE A REPLY

*