जिल्ह्यात मुसळधार : उष्म्यापासून नागरिकांना दिलासा

0

नाशिक | दि. ७ प्रतिनिधी- परतीच्या पावसानेही नाशिककरांवर आपली कृपादृष्टी कायम ठेवली असून आज दुपारच्या सुमारास जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने हजेरी लावली.

ऑक्टोबर हिटचा तडाखा त्यात अघोषित भारनियमानामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नाशिककरांना या पावसाने दिलासा दिला. आज दिवसभरात सुमारे १९ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात झालेल्या या पावसामुळे सिन्नर तालुक्यात वीज अंगावर पडून एका गायीचा मृत्यू झाला तर पेठ तालुक्यात दोन बैल आणि एक रेड्याचा मृत्यू झाला.

शनिवारी सकाळी शहरात कडक ऊन पडले होते. त्यामुळे वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ८ ते १० तासांचे भारनियमन सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच भर दुपारी काळोख दाटून आला. दुपारी ३ वाजेनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. जोरदार सरी कोसळल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

तालुक्यात सकाळी साडेआठ ते साडेपाचपर्यंत दोन मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातही काही तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. पेठ तालुक्यात १० मिलीमीटर, सिन्नर आणि त्र्यंबकेश्‍वरमध्ये प्रत्येकी तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

पेठ तालुक्यातील खिरकाडे, बेहडमाळ येथे वीज अंगावर पडून दोन बैल आणि एका रेड्याचा मृत्यू झाला. उत्तम नाठे, सुरेश नाठे आणि अर्जुन गायकवाड यांच्या मालकीची ही जनावरे होती. सिन्नर तालुक्यातील एकलहरे येथे दुपारी तीन वाजता देवराम चव्हाणके यांच्या घराजवळ गायीवर वीज कोसळली. त्यामुळे गायीची मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

*