जिल्हा बँक भरती प्रक्रिया : नोकर भरतीच्या चौकशीला सामोरे जाणार

0

संचालक मंडळाच्या बैठकीनंतर अध्यक्ष गायकर यांची माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा बँकेच्या भरतीसंदर्भात सहकार खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार झाल्यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश दिले असून प्रत्यक्षात चौकशीला सुरूवात झाली आहे. सहकार खात्यांचे अधिकारी बँकेच्या भरतीबाबत बँकेकडे चौकशी करत आहे. बँकेची नोकर भरती ही नाबार्डने ठरवून दिलेल्या निकषानूसार करण्यात आलेली. यामुळे बँकेच्या नोकरभरतीच्या चौकशीला संचालक मंडळ सामारे जाणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी दिली.

बँकेच्या नोकरभरतीला विभागीय सहनिबंधक मिलींद भालेराव यांनी स्थगिती दिल्यानंतर संचालक मंडळा अवगत करण्यासाठी गुरूवारी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. त्यानंतर पत्रकारांशी अध्यक्ष गायकर बोलत होते. यावेळी आ. वैभव पिचड, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, जनरल मॅनेजर किशोर भिंगार उपस्थित होते. पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर संचालक आ. शिवाजी कर्डिले आणि संचालक अण्णासाहेब म्हस्के निघून गेले.

यावेळी अध्यक्ष गायकर यांनी स्पष्ट केले की, नाबार्डने ठरवून दिलेल्या चार संस्थेपैकी एक असणार्‍या पुण्याच्या नायबर कंपनीला भरतीचे काम देण्यात आले. या भरती संबंधीत कंपनीने 90 गुणांची लेखी परीक्षा घेतली. परीक्षा झाल्यानंतर पात्र असणार्‍या उमदेवारांची नावे बँकेच्या संकेतस्थावर प्रसिध्द करण्यात आली. बँकेच्या निवड समितीत परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या उमेदवारांना 5 गुण शैक्षणिक अर्हतेला आणि 5 गुण समितीच्या पातळीवर देण्याचे अधिकार होते. या समितीत सात सदस्य असून यातील पाच सदस्य हे शासकीय सदस्य असून अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे दोन अशासकीय सदस्य होते. यामुळे भरती प्रक्रिया राबवतांना बँक प्रशासन, पदाधिकारी आणि संचालक मंडळाच्या हातात काही नव्हते.

बँकेचे उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मुलांची नावे पात्र यादीत आले आहेत. याबाबत संचालक मंडळाला कोणतीच कल्पना नव्हती. हे नावे परीक्षा उत्तीर्ण होवून यादीत आलेली आहेत. सहकार खात्यामार्फत सुरू असणार्‍या चौकशीत हा प्रकार चुकीचा असल्याचे सिध्द झाल्यास संबंधीतांना अपात्र करण्यात येईल, असे गायकर यांनी यावेळी स्पष्ट केले. या भरतीसंदर्भात बँकेच्या संचालक मंडळाचे काहीही म्हणणे नसून सहकार खात्याने आदेश दिल्या भरती स्थगित करून अथवा फेर भरती घेवू असे त्यांनी सांगितले. संचालक मंडळ नोकरभरतीच्या चौकशीला समोरे जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, बँकेच्या कर्मचार्‍यांचा आकृतीबंद नाबार्डने ठरवून दिलेला आहे. त्यांच्या परवानगीने भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. यामुळे भरतीबाबत शंका उपस्थित करणे गैर असल्याचे मत अध्यक्ष गायकर यांनी नोंदवले. बँकेच्या भरतीसंदर्भात संचालक मंडळाला काहीही माहित नाही. संचालक मंडळापर्श्‍चात कोणी गैरकृत्य केले असले तर ते संचालक मंडळाला माहित नाही. बँकेच्या भरतीबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी तक्रार केल्यानंतर त्यांची भेट घेवून वस्तूस्थिती त्यांच्या निदर्शनाास आणून देण्यात आली होती, असे गायकर यांनी पत्रकरांना सांगितले. सहकार खात्याचा चौकशी अहवाल स्वीकारून त्यानूसार पुढे निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी गायकर यांनी स्पष्ट केले.

………….
नोकरभरती बाबत बँकेकडे कोणतीच जबाबदारी नव्हती. यामुळे भरतीसंदर्भात बँकेचा कोणताच थेट संबध नाही. भरती बाबत शंका उपस्थित झाल्यानंतर एका लेखी खुलासा आणि एकादा पत्रकार परिषदेत घेवून माहिती देण्यात आली असल्याचे गायकर यांनी यावेळी सांगितले.
…………….

LEAVE A REPLY

*