जिल्हा बँक भरतीच्या चौकशीचे सहकार सचिवांचे आदेश

0

शेतकरी महासंघाच्या तक्रारीला यश

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा बँकेने रिक्त असणार्‍या 465 जांगासाठी भरती प्रक्रिया राबवली होती. या भरतीत वर्ग 2 च्या अधिकारी पदाच्या मुलाखतीमध्ये काही उमदेवारांना डावलण्यात आले होते.
या विरोधात मराठा महासंघ प्रणित शेतकरी महासंघाच्या माध्यमातून सहकार खात्याचे सचिव यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानूसार सहकार आयुक्त यांनी विभागीय सहनिबंधक यांच्यांना बँकेच्या भरतीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.
जिल्हा बँकेच्या रिक्त 465 जांगासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. सुरूवातीपासून बँकेची भरती प्रक्रिया वादात होती. भरतीसाठी लेखी परीक्षा घेणारी पुण्यातील संस्थेची नेमणुकीवरून प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आला.
त्यानंतर भरतीसाठी लेखी परीक्षा होवून मुलाखतीसाठी पात्र असणार्‍या वर्ग 2 च्या काही उमदेवारांना अनुभवाच्या कारणावरून डावलण्यात आले असल्याचा आरोप झाला. बँकेच्यावतीने भरतीच्या जाहीरातीमध्ये बँकिंग क्षेत्राचा 5 वर्षाचा अनुभव असा उल्लेख केलेला आहे. वास्तवात जाहीरातीमध्ये बँकेत 5 वर्षाचा कामाचा उल्लेख असा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक होते.
तसेच बँक प्रशासनाच्या काही भूमिका संशयास्पद असून या भरतीमध्ये रिक्त राहणार्‍या जागा भरण्यासाठी नव्याने भरतीसाठी परवानगी मागण्याचा बँकेचा विचार आहे. यासह रोजंदारीवरील कर्मचार्‍यांना कायम करण्यासाठी नव्याने शिपाई पदासाठी भरती घेण्याचा बँकेचा डाव आहे.
या सर्वाच्या विरोधात शेतकरी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी सहकाय आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच बँकेच्या भरती सोबतच बँकेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी यांच्या चौकशीची मागणी केली होती. सहकार आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेतली असून विभागयी सहनिबंधक यांनी बँकेच्या भरतीची चौकशी करून आयुक्त कार्यालयास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.

 

LEAVE A REPLY

*