जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या रा. ब. नारायणराव बोरावके महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र शासन वनविभागाच्या वन महोत्सव सप्ताहनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी बोरावके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एच. शिंदे, डाकले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव भोर हे उपस्थित होते.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्रसेना विभाग, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ विभाग, वनस्पतिशास्त्र विभाग आदी विभागाच्यावतीने 51 झाडांचे रोपण करण्यात आले.
यावेळी डॉ. ए. के. मोहिते, डॉ. सुनील खिलारी, डॉ. सुनील चोळके, डॉ. के. डब्ल्यू. पवार, डॉ. उज्ज्वला भोर, डॉ. बाळासाहेब शेळके, प्रा. व्ही. एस. बारस्कर, प्रा. आर. जी. गायधने, प्रा. सुजाता पोखरकर, प्रा. पी. व्ही. डेंगळे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – नगरपरिषदेतर्फे हरित श्रीरामपूर करण्याच्यादृष्टीने प्रभाग क्र. 16 मधील पूर्णवादनगर रस्त्यापासून वृक्षरोपण कार्यक्रम नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते तर मुख्याधिकारी सुमंत मोरे, नगरसेविका स्नेहल खोरे, नगरसेवक किरण लुणिया, केतन खोरे, विजय डावखर, अभियंता साठे आदींच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक म्हणाल्या, नैसर्गिक देणगीची संवर्धन करणे अत्यंत गरजेचे असून नगरपरिषदेची ही मोहीम प्रशासनासह स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सहज यशस्वी होऊ शकते. नागरिकांनी आपल्या परिसरातील एक झाड दत्तक घेतल्यास हरित श्रीरामपूर संकल्पना यशस्वी करणे सोपे होईल. यासाठी प्रत्येकाने एक झाड दत्तक घ्यावे असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले.
यावेळी अनिल काजळे, विजय नगरकर, कुलांगे, आदित्य आदिक, ऋषिकेश डावखर, डॉ. धस, सौ. लबडे, सावंत, झांबरे, अस्वले, परदेशी, पिंजारी, शेख, धनगे, लांडे, शिंदे, जगताप, शहाणे, लोळगे, मगरे उपस्थित होते.

अहमदनगर (प्रतिनिधी) – विळद येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचालित कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमात तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे कृषी सप्ताहाचा आरंभ केला. प्रारंभी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कृषिदूतांच्या हस्ते मान्यवर व ग्रामस्थ यांना वृक्षाची रोपे वाटप करण्यात आली. यावेळी सरपंच संतोष झिने, उपसरपंच एम. एम. बनकर, ग्रामसेवक डी. एस. अडसुरे, प्राचार्य ज्ञानदेव खराडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात दुर्गेश वाघ याने कृषी दिनानिमित्त शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन सुयश शिंदे यांनी केले. तर आभार किरण मोहिते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषिदूत आशिष गोंदकर, सौरभ साठे, शरद शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना प्राचार्य डॉ. एच. एल. शिरसाठ, कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. आर. एल. कदम, कार्यक्रम अधिकारी व्ही. एस. निकम यांचे मार्गदर्शन लाभले.

कोपरगाव (प्रतिनिधी) – सिमेंटच्या जंगलांमुळे वनराई नष्ट होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल ढासळत असून वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन काळाची गरज झाली आहे अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असे प्रतिपादन प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी केले.
कृषी दिनानिमित्त पंचायत समिती कोपरगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सौ. पुष्पाताई काळे बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी तहसीलदार किशोर कदम, पंचायत समितीच्या सभापती अनुसयाताई होन, उपसभापती अनिल कदम, गटविकास अधिकारी कलोडे, जि. प. सदस्य सुधाकर दंडवते, सोनालीताई साबळे, कारभारी आगवन, कृषी अधिकारी वाघिरे, मनोज सोनवणे, उपाभियंता घुले, पं. स. सदस्य श्रावण आसने, मधुकर टेके, अर्जुनराव काळे, माजी सदस्य प्रशांत वाबळे, वर्षाताई दाणे, पूर्णिमा जगधने, योगिता पवार, नगरसेविका प्रतिभाताई शिलेदार, वर्षाताई गंगुले, रोहिदास होन, योगेश खालकर आदी मान्यवर उपस्थित होते.

संगमनेर (प्रतिनिधी) – येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून 100 वृक्षांचे रोपण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देशमुख यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपप्राचार्य मेधा शिरोडे, पर्यवेक्षक प्रा. डॉ. शांताराम रायसिंग, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. किशोर डोंगरे, प्रा. भाऊसाहेब रुपवते, प्रा. चारुशिला गुजर, प्रा. अर्चना कोल्हे, प्रा. सविता शिंदे, प्रा. प्रताप फलफले, प्रा. डॉ. सचिन कदम, एनएसएस विद्यार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या परिसरात 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना देण्यात आली.

तळेगाव दिघे (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती व कृषिदिन साजरा करण्यात आला. सरपंच प्रमिलाताई जगताप यांच्या हस्ते व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत तलाठी कार्यालयासमोर वृक्षारोपण करण्यात आले.
दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. सरपंच प्रमिलाताई जगताप, उपसरपंच बाळासाहेब दिघे, मच्छिंद्र दिघे, आत्माराम जगताप, सचिन दिघे, भागवत दिघे, दिलीप दिघे, वाळिबा दिघे, संजय दिघे, रामहरी भागवत, निवृत्ती दिघे, गणेश बोखारे, शशिकांत जगताप, ग्रामविकास अधिकारी एस. एम. वावीकर, कामगार तलाठी बी. के. जेडगुले उपस्थित होते. कृषी दिनाच्या औचित्यावर ग्रामस्थांनी वृक्ष लागवड करण्याचा व संवर्धनाचा संकल्प केला.

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – बदलत्या निर्सग चक्रामुळे वृक्ष लागवड व संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. यामुळे श्रीगोंदा पंचायत समितीच्या सर्व विभागांनी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्ष लागवड करावी असे आदेशच सभापती पुरुषोत्तम लगड यांनी दिले.
श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये कृषिदिन साजरा करण्यात आला. त्यानंतर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने सर्व शिक्षा अभियान समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत 23 दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले, त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात सभापती लगड बोलत होते.
यावेळी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 10 शेळीगट व 4 कुक्कुटपालन गटाला मंजुरीपत्राचे वाटप करण्यात आले. यानंतर पंचायत समितीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उपसभापती प्रतिभा झिटे, पंचायत समिती सदस्य कल्याणी लोखंडे, गीतांजली पाडळे, शहाजी हिरवे, अण्णासाहेब शेलार, जिजाबापू शिंदे, अमोल पवार, मनीषा कोठारे, आशाताई गोरे, नानासाहेब ससाणे, रजनी देशमुख आदी पदाधिकारी व श्रीगोंदा पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.

तळेगाव दिघे (वार्ताहर) – प्रत्येकाने स्वतःसाठी झाडे लावावीत. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करावे व वृक्षरोपांची भेट द्यावी. विद्यार्थ्यांनी वृक्षरोपांची लागवड करून आपले योगदान द्यावे. पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपणाची गरज असल्याचे प्रतिपादन वनक्षेत्रपाल हर्षल पारेकर यांनी केले.
तळेगाव दिघे येथील न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात वृक्षलागवड सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य बी. के. कुटे होते. यावेळी विभागीय अधिकारी पी. पी. भामरे, पर्यवेक्षक संपतराव मुळे, विलास सोनवणे, सोपान मेहेत्रे, लक्ष्मण दिघे, चंद्रभान हापसे, शिवाजी दिघे, भागवत दिघे, संजय दिघे, बाबासाहेब गागरे, रामहरी भागवत, बी. एस. फटांगरे, प्रताप जोंधळे, संजय डोंगरे यांच्यासहित अन्य मान्यवर उपस्थित होते. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी प्रबोधन दिंडी काढून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या घोषणा दिल्या. प्रास्ताविक पर्यवेक्षक संपतराव मुळे यांनी केले. सूत्रसंचालन हरित सेना प्रमुख सुनील दिघे यांनी केले, तर राम गायकवाड यांनी आभार मानले.

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – वृक्ष लागवड हा केवळ देखावा न राहता लावलेल्या वृक्षाची जोपासना झाली पाहिजे. वृक्ष लागवड ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात महत्वाची असल्याने लोकप्रतिनिधी बरोबरच नागरीकांनी या चळवळीत सहभाग नोंदविला तर भविष्यात भेडसविणार्‍या अडचणीवर मात करता येवू शकते असे मत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.
शेवगाव तालुक्यातील बाभुळगाव ते राक्षी रस्त्याच्या दुतर्फा महाराष्ट्र शासनाच्या 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ ना. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मोनिका राजळे, भाजपचे तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, तहसीलदार दीपक पाटील, वनअधिकारी पी. पी. भामरे, उपवनसंरक्षक ए. लक्ष्मी, नगरसेवक अरूण मुंढे, महेश फलके, गंगा खेडकर, गणेश कराड, दिनेश लव्हाट आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक कचरू चोथे यांनी केले.
सूत्रसंचलन भाजपाचे तालुका सरचिटणीस भिमराज सागडे यांनी केले तर अमोल घोलप यांनी आभार मानले.

पुणतांबा (वार्ताहर)- हरितक्रांतीचे जनक व राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वंसतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुणतांबा येथील ग्रामसचिवालयाच्या सभागृहात कृषिदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी सरपंच सौ. छायाताई जोगदंड होत्या. यावेळी पुणतांबा विकास आघाडीचे नेते धनंजय जाधव, उपसरपंच प्रशांत वाघ, ग्रा. पं. सदस्य अभय धनवटे, बाळासाहेब गगे, माजी सरपंच बाप्पासाहेब वाघ, सुधाकर जाधव, गणेश बनकर, भाऊसाहेब केरे, डॉ. अविनाश चव्हाण, संभाजी गमे, नितीन सांबारे, अशोक धनवटे, नामदेव बोरबने, चंद्रकांत वाटकर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी धनंजय जाधव यांनी कृषी आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असून शासनाने कृषी दिनाच्या राज्यभर कृषी सभांचे आयोजन करुन शेतकर्‍यांना शासनाच्या धोरणांची माहिती मिळेल, असे सांगितले. शेतकर्‍यांच्या प्रगतीशिवाय कोणाचाच विकास शक्य नाही. कृषी क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक निधीची आहे, त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी यापुढे संघर्ष चालू ठेवण्याचा निर्धारही जाधव यांनी व्यक्त केला. प्रशांत वाघ यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

*