Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जिल्हा प्रशासनाच्या व्हॉट्अ‍ॅप ग्रुपवरील 260 तक्रारी निकाली; प्रशासनात गतीमानता आणण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांचा प्रयोग

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा प्रशासनातील कामकाजात गतीमानता आणण्यासाठी व महसूल विभागातील प्रकरणे, कामाची प्रगती यांची संंबंधित अर्जदाराला माहिती मिळावी यासाठी व्हॉटस्अ‍ॅप नंबर सेवा सुरु करण्यात आली आहे. या नंबरवर आतापर्यंत 288 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 260 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. शिल्लक तक्रारी एक दोन दिवसातील असून त्याचा देखील निपटारा केला जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

‘शासनाचे काम अन् बारा महिने थांब’ असे नेहमी म्हटले जाते. महसूल विभागात तर छोट्या कामांसाठी अर्जदारांना खेट्या माराव्या लागायच्या. प्रशासनाची ही ओळख पुसण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांंढरे यांच्या पुढाकारातून व्हॉटस्अप नंंबरवर तक्रारीचा निपटारा ही सुविधा उपलब्ध करुन देण्यता आली. अनेकदा लहान-सहान कामांच्या फाईलही महिनोंमहिने धूळ खात पडून असतात. आपल्या प्रकरणांचे, अर्जाचे, फाईलींचे काय झाले याची माहीतीही मिळत नाही.

महसूल कामांबाबत अर्जदरांना त्यांच्या प्रकरणाचे, फाईलींचे काय झाले, कामात किती प्रगती झाली याची माहिती घरबसल्या देण्यासाठी व्हॅाटस्अ‍ॅप नंबर योजना सुरु केली आहे. त्याअंतर्गत संबधित तक्रारदाराला आपला या नंबर केवळ आपल्या प्रकरणांची माहिती, अर्ज, किंवा त्याचा फोटो पुरावा म्हणून टाकल्यास पुढील दोन-तीन दिवसांत लागलीच त्याची सध्यस्थिती सांगितली जाते. शिवाय आवश्यक तेथे मार्गदर्शन करत कागदपत्रांची पुर्तताही कऱण्यासाठीही माहिती दिली जाते.

पंधरा दिवसांच्या आत त्याला उत्तर देणे जिल्हाधिकार्‍यांनी बंधनकार केले आहे. त्यामुळे आता नागरिकांनाच्या जमीनी खरेदी-विक्रीच्या नोंदी, जुन्या नोंदी, रस्त्यांच्या बाबतची प्रकरणे, रेशनकार्डबाबत माहिती, सातबारा संबधित अद्यावत माहीती अशा तक्रारी प्राप्त होत असून, त्याची माहिती दिली जाते.

व्हॉटस्अ‍ॅप नंबरवर हाय, हॅलो
जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील तलाठी, आपल सरकार केंद्र या सर्व ठिकाणी या उपक्रमाची माहिती देणारा फलक लावणे व त्यात व्हॉटस्अ‍ॅप क्रमांक (9421954400) देणे बंधनकारक आहे. परंतू काही जण तक्रारी ऐवजी गुड मॉर्निंग, गुड नाईट, सण उत्सवांच्या शुभेच्छांचे संदेश पाठवतात. तर, काहीजण या उपक्रम चांगला असल्याचे संदेश देखील पाठवतात, असे अनुभव प्रशासनाला येत आहे.

जिल्हाधिकार्‍यांचा वॉच
जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेसाठी स्वतंत्र कक्ष व दोन कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. दिवसभर या ठिकाणी व्हॉटस्अ‍ॅप नंबरवर आलेल्या तक्रारीचा निपटारा केला जातो. उपजिल्हाधिकारी अरविंद अतुर्लीकर रोज कामाचा आढावा घेतात. जिल्हाधिकारी आठवडयातून कामाची प्रगतीची माहिती घेऊन त्यावर बारीक लक्ष ठेवतात.

मागील दोन महिन्यात 288 तक्रारी या नंबवर प्राप्त झाल्या. त्यापैकी 260 तक्रारीचा निपटारा करण्यात आला आहे. उर्वरीत तक्रारीही दोन तीन दिवसात निकाली काढल्या जातील.
– अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी (प्रशासन)

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!