Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जिल्हा शिक्षक पुरस्काराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

Share

पुढील आठवड्यात जिल्हा समितीची बैठक : 37 शिक्षक स्पर्धेत

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने दिल्या जाणार्‍या जिल्हा शिक्षक पुरस्काराची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तालुका पातळीवर पुरस्कारासाठी ऑनलाईन माहिती सादर केलेल्या शिक्षकांची पडताळणी पूर्ण झाली असून पुढील आठवड्यात जिल्हास्तरीय समितीची बैठक होणार आहे. यंदा जिल्ह्यातील 14 शिक्षक पुरस्कारासाठी 37 जण इच्छुक आहेत. गतवर्षी प्रमाणे यंदा देखील पुरस्कारासाठी शिक्षकांना परीक्षा द्यावीच लागणार आहे.

दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने 14 तालुक्यांतून प्रत्येकी एक अशा 14 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात येते. यासाठी स्वतंत्रपणे प्रक्रिया राबविण्यात येते. 2016 पासून जिल्हा पुरस्कारासाठी पात्र आणि निकष पूर्ण करणार्‍या शिक्षकांची ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात येतात. त्या प्रस्तावाची तालुका पातळीवर क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्याची माहिती जिल्हास्तरावर पाठविण्यात येते. विद्यमान स्थिती जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून 2 अथवा 3 असे 37 प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त झाली होती. यात प्रत्येक तालुक्यातून किमान एका महिलेचा प्रस्तावाचा समावेश आहे.

आता तालुकास्तरावरून आलेल्या प्रस्ताव जिल्हा समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. या समितीच्या अध्यक्षा या जिल्हा परिषद अध्यक्षा आहेत. समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपाध्यक्षांसह अन्य सदस्यांचा समावेश आहे. गतनूसार यंदा देखील सर्वाधिक गुणांकन घेणार्‍या शिक्षकांची परीक्षा घेण्यात येणार असून त्यानंतर पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होणे शक्य राहणार आहे. त्यानंतर 5 सप्टेंबरला निवड होणार्‍या शिक्षकांचा सन्मान होणार आहे.

या पुरस्कारासाठी शिक्षकांना अध्यापनासोबत विविध उपक्रम, ई-लर्निंग साहित्य, शैक्षणिक वेबसाईड, शैक्षणिक ब्लॉग निर्मिती, विविध प्रशिक्षण, संदर्भग्रंथांचा वापर, कृती युती संशोधन, विविध सामाजिक कार्य, स्वत:च्या वर्गातील विद्यार्थी उपस्थिती, बाल आंनद मेळावे, शाळासिध्दी उपक्रम, जीवन कौशल्य उपक्रम, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, शैक्षणिक सहल, शिवार भेट, शिवार फेरी आदी उपक्रम राबविणे आवश्यक आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!