Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जिल्ह्यात परतीच्या पावसाचे धुमशान

Share

मका, बाजरी, फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरसह राज्याच्या विविध भागांत मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याची स्थिती झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वदूर कुठे मुसळधार तर कुठे तुरळक पावसाने हजेरी लावली. अकोलेत भातपिकाचे, अन्य ठिकाणी मका, बाजरी पिके तसेच शेवंती, झेंडू फुलांचे नुकसान झाले आहे. येत्या 48 तासांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकर्‍यांपुढच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात मंडलनिहाय झालेला पाऊस असा- (मिमी) नेवासा- नेवासा 37, सलाबतपूर 60, कुकाणा 64, चांदा 61, घोडेगाव 51, वडाळा बहिरोबा 55, सोनई 49. नगर- नालेगाव 24, जेऊर 12,रूईछत्तीसी 36, भिंगार 22, सावेडी 19. पाथर्डी- पाथर्डी 25, टाकळीमानूर 40, करंजी 30, कोरडगाव 30. शेवगाव- शेवगाव 39, बोधेगाव 40, भातकुडगाव 46, एरंडगाव 30, ढोरजळगाव 37. पारनेर- पारनेर13, सुपा 16, वाडेगव्हाण 43.श्रीगोंदा-श्रीगोंदा 29, पेडगाव 17, काष्टी 18, चिंभळा 24, बेलवंडी 41, देवदैठण 26. कर्जत-कर्जत 40, राशीन 67, भांबोरा 56, कोंभळी 30, माही 24, मिरजगाव 37. जामखेड- जामखेड 28, खर्डा 17, नायगाव 12, अरणगाव 14. श्रीरामपूर-श्रीरामपूर 45, उंदिरगाव 36, बेलापूर 69, टाकळीभान 36. राहुरी-राहुरी 34, वांबोरी 17, देवळाली 34,ब्राम्हणी 42, टाकळीमिया 47. राहाता-राहाता 28, पुणतांबा 40, शिर्डी 18. संगमनेर-संगमनेर11, आश्वी 12, शिबलापूर 15, साकूर 36, घारगाव 15. अकोले-अकोले 26, राजूर 19, समशेरपूर 23, कोतूळ 33, वीरगाव 36, साकीरवाडी 38. कोपरगाव-कोपरगाव 5, पोहेगाव 13, दहिगाव बोलका 23, रवंदे.

मुळा तिसर्‍यांदा ओव्हरफ्लो
नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातून काल रविवारी दुपारी 4 वा. 3 मोर्‍यांतून 300 क्युसेकने पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. पारनेर व कोतूळ येथे पाऊस पडल्याने धरणाकडे पाण्याची आवक वाढली

गोदावरी, प्रवरेतही पाणी
गोदावरी मधमेश्वर बंधार्‍यातून 1614 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. पाणलोटात पाऊस वाढल्याने भंडारदराचे नवीन पाणी प्रवरा नदीतही वाढले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!