Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेतही तरुणाईचे पर्व !

Share
विकास मंडळाच्या सभेकडे शिक्षकांची पाठ, Latest News Vikas Mandal Meeting Teacher Not Intrested Ahmednagar

शिक्षकांच्या राजकारणाला मिळणार नवी दिशा ?

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा शिक्षक बँकेच्या निवडणुकीचे पडघम आतापासून वाजण्यास सुरूवात झाली आहे. बँकेच्या निवडणुकीत यापूर्वीच्या पारंपारिक मंडळांना बगल देत जिल्ह्यातील तरूण शिक्षकांचा वर्ग एकटवण्यास सुरूवात झाली असून त्यादृष्टीने या शिक्षकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे येणार्‍या बँकेच्या निवडणुकीत शिक्षकांच्या राजकारणात तरुणांचे पर्व सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. असे झाल्यास बँकेच्या विद्यमान राजकारणात असणार्‍या सर्व मंडळांची मोठी पंचायत होणार आहे.

प्राथमिक शिक्षक बँकेभोवती जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे राजकारण फिरते. शिक्षकांच्या या राजकारणाने जिल्ह्याला नव्हे तर राज्याला (कै.) भा. दा. पाटील यांच्यासारखे कणखर नेतृत्व दिले. मात्र, मधल्या काळात एकही राज्यस्तरावर दबदबा निर्माण करणारा नेता जिल्ह्यात निर्माण झाला नाही. याला कारण देखील फोडाफोडीचे आणि मानापानाच्या नाट्यामुळे शिक्षकांच्या राजकारणात फूट पडत गेली ती कायमचीच. मात्र, आता हे थांबावे, यासाठी तरुण शिक्षकांनी एका छताखाली येऊन जिल्ह्याला नवी दिशा देण्याच्या हालाचाली सुरू केल्या आहेत.

जिल्ह्यात शिक्षकांच्या राजकारणात सक्रिय असणारे मंडळापैकी अनेक मंडळे ही वेगवेगळ्या कारणाने एकमेकांवर चिखलफेक करत, एका मंडळातून फुटून नवीन मंडळे स्थापन करत बँकेत सत्तेवर आल्याचे जिल्ह्याने अनुभवलेले आहे. सभासदांचे हित या गोंडस नावाखाली अनेकांनी नेतेपद भूषवले, राजकीय फायदे करून घेतले. मात्र सभासद आजही मागणी करणाराच ठरत आहे. बँकेच्या आजवरच्या सर्वसाधारण सभेने शिक्षक प्रतिमा अनेकदा मालिन झालेली आहे. मात्र, आता नव्या दमाच्या शिक्षकांनी आपल्या जुन्या सहकार्‍यांचा हा गुण टाकून देत नव्या उमेदीने नवा पर्याय सभासदांसोर देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

दर पंचवार्षिकला केवळ सत्तेसाठी मंडळ बदलून सत्ता हातात घेणारे जिल्ह्यातील काही ठराविक नेते प्रामुख्याने दिसतात. शिक्षक सभासदांसमोर सक्षम पर्याय नसल्याने दरवेळी यांनाच मते देऊन निवडून आणावे लागत असल्याने आता सभासद मतदान करू की नको अशा निर्णयापर्यंत आल्याचे या तरुण शिक्षकांचे म्हणणे आहे.

राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे नेतृत्व करणारे सध्याचे हे सर्व नेते जिल्हाभर तालुकानिहाय भेटी घेऊन आपला निर्णय लवकरच जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. हक्काचे 2 हजार 500 हुन अधिक सभासद मतदार सोबतीला असून जुन्या मंडळांवरचा विश्वास उडाल्याने आणि आता सर्व काही तरुणांच्या हाती दिले पाहिजे असे मत असणारे जिल्ह्यातील हजारो शिक्षक सभासद पाठीशी असल्याचे यातील पदाधिकार्‍यांनी सांगितले. राज्य जुनी पेंशन हक्क संघटन हे राज्यव्यापी संघटन असून ते राज्यातील सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेंशन मिळावी याकरिता राज्य स्तरावर लढा व संघर्ष उभा करीत आहे. यातील महत्वाचे पदाधिकारी बँकेच्या राजकारणात सक्रिय होणार असले तरी राज्य जुनी पेंशन हक्क संघटन हे आपल्या पेंशन मिळवण्यासाठी कायम सर्वांना सोबत घेऊन संघर्ष करीत राहील, हे पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत जिल्हास्तरीय नुकतीच बैठक पार पडली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या बैठकीला संघटनचे विश्वस्त बाजीराव मोढवे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठोकळ, राज्यनेते योगेश थोरात, जिल्हा उच्चाधिकार अध्यक्ष केशव कोल्हे, कार्याध्यक्ष सचिन नाबगे, उच्चाधिकार नेते संगमनेरहुन शिवाजी आव्हाड, पाथर्डीहुन अमोल भंडारी, शेवगावहुन राज्याप्रतिनिधी मच्छिंद्र भापकर, जिल्हा कोषाध्यक्ष अमोल सोनवणे, जिल्हा सहकार्याध्यक्ष प्रतीक नेटके, सरचिटणीस भाऊसाहेब पाचारणे, जिल्हा नेते सतीश पटारे, संगमनेर तालुकाध्यक्ष निलेश हारदे, संगमनेर कोषाध्यक्ष विकास खेबडे, नगर तालुक्यातून अरविंद थोरात, जिल्हा सल्लागार नाना गाढवे, पारनेर तालूकाध्यक्ष बाबासाहेब धरम, पारनेर शिलेदार दादा वाघ, कर्जत तालुकाध्यक्ष विनोद देशमुख, जामखेड माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र कदम, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष भाऊ गिरमकर, अकोले शिलेदार सदानंद चव्हाण, नेवासा मधून नितीन दळवी, प्रकाश मुरकुटे, सुभाष भांड, सुरेश कवडे, कर्जत मधून योगेश खेडकर, नितीन पवार, पारनेरहुन वैभव पठारे, गणेश डेरे आदी शिलेदार उपस्थित होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!