Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जिल्ह्यात कुणाला मंत्रिपद, देवस्थानांवर कुणाची वर्णी

Share
नेवाशाच्या नगरसेविका फिरोजबी पठाण यांचे सदस्यत्व नगरविकास मंत्र्यांकडून कायम, Latest News Corporators Pathan Membership Saf Newasa

सोशल मीडियावर रंगली जोरदार चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाशिवआघाडीच्या स्थापनेमुळे नगर जिल्ह्यात शिवसेना, काँग़े्रस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आतापासूनच कुणाला मंत्रिपद मिळणार, कोण महापौर होणार, कुणाला महामंडळावर स्थान मिळणार, कोणत्या संस्थेत कुणाची सत्ता जाणार, कुणाची सत्ता येणार यांची गणितं मांडली जात आहेत. एवढेच नव्हेतर सत्तास्थापने अगोदरच काहींनी सोशल मीडियावर मंत्रिपदाचे वाटपही करून टाकले आहे. यात नेमकी कुणाची ‘लॉटरी’ लागते हे येणारा काळच ठरविणार आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यांचेच सरकार स्थापन होईल असे वाटत असताना त्याला नाट्यमय वळण मिळाले. मुख्यमंत्रीपदासाठी भाजप आणि शिवसेनेत जुंपली. हे प्रकरण इतके हातघाईवर गेले की दोघांनी एकमेकांवर टीका सुरू केली. त्यातून त्यांच्या मैत्रीला तडा गेला. राज्यपालांनी भाजपाला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. पण शिवसेनेचा पाठिंबा नसल्याने त्यांनी सरकार स्थापण्यातून माघार घेतली. त्यानंतर शिवसेनेला बोलावण्यात आले.

त्यानंतर प्रचंड घडामोडींना वेग आला.काँगेस-आणि राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देणार आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार अशा बातम्या आल्या. पण वेळेत काँगे्रस आणि राष्ट्रवादीचे पाठिंब्याची पत्रे न मिळाल्याने राज्यपालांनी राष्ट्रवादीला निमंत्रित केले. या दरम्यान पुन्हा घडामाडी घडल्या. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्याचवेळी महाशिवआघाडीच्या स्थापण्याची चर्चा झडू लागली. गत दोन दिवसांपासून त्याद़ृष्टीने शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा सपाटा सुरू आहे. याबाबतच अंतिम निर्णय लवकरच होणार आहे. पण कुणाला मंत्रीपद मिळणार, कोण महापौर होणार, कुणाला महामंडळावर स्थान मिळणार, कोणत्या संस्थेत कुणाची सत्ता जाणार, कुणाची सत्ता येणार चर्चा गावकट्ट्यांवर व सोशल मीडियावर होत आहे. आगामी काही महिन्यात जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे यंदा विखे-थोरात गटात संघर्षाची चिन्हे आहेत.

देवस्थानांचेही वाटप !
शिर्डीचे साईबाबा संस्थान भाजपाकडे होते. सर्वोच्च न्यायलयाने ते बरखास्त केले. त्यात आता भाजपाची सत्ता नाही. त्यापूर्वी या संस्थानवर काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यामुळे महाशिवआघाडीची सत्ता आल्यास या संस्थानचा कारभार पुन्हा कांँग्रेसकडे जाणार असल्याची कार्यकर्त्यांत भावना आहे. तर पंढरपूरचे विठ्ठल मंदिराची चावी राष्ट्रवादीकडे जाईल. शनि शिंगणापूरच्या देवस्थानची जबाबदारी पुन्हा आ. शंकरराव गडाखांकडे जाणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या देवस्थानांवर अध्यक्ष, उपाध्यक्ष व विश्वस्तपदी कुणाची वर्णी लावली जाऊ शकती याबाबतची नावे चर्चिली जात आहेत. विश्वस्तासाठी नवीन चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

यांची नावे चर्चेत
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना महत्त्वाचे कॅबिनेट खाते तसेच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्याकडेही महत्त्वाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. नगरचे आमदार संग्राम जगताप यांनाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते पिचड यांना राष्ट्रवादीने अनेक पदे दिली. पण संकटाच्या काळात त्यांनी साथ सोडली. त्यामुळे त्यांच्या विरोधात विजयी झालेल्या डॉ. लहामटेंनाही संधी मिळणार असल्याचे सोशल मीडियात चर्चीले जात आहे. काही निष्ठावानांना विधानपरिषदेवर घेतले जाऊ शकते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!