Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जिल्ह्यात ‘हुडहुडी’ वाढली

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- पावसाने दिलेली उघडीप आणि उत्तरेकडील येणार्‍या शीतलहरींमध्ये झालेली वाढ यामुळे नगर जिल्ह्यासह राज्यात थंडी वाढली आहे. अनेक ठिकाणी तापमानात 3 ते 4 अंशांची घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान नगरमध्ये 12.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

परतीच्या पावसाने ऑक्टोबर तसेच नोव्हेंबरचा काही दिवसांत जिल्ह्यात धुमाकूळ घातला. परिणामी थंडीला आगमनाची संधीच मिळाली नाही. गेल्या आठ दिवसांत पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली नी थंडीचा हळूहळू शिरकाव होऊ लागला. सलग पाच दिवस नगर जिल्ह्यातच निचांकी तापमान नोंदले गेले. त्यानंतर बुधवारी नागपूरात राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. गुरूवारी पुन्हा नगर जिल्हयातील तापमानात घट झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान 12.2 अंश सेल्सिअस नगरमध्ये नोंदवले गेले.  थंडी वाढू लागल्याने गरम कपड्यांना मागणी वाढली असून दुकानांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. तसेच शेतकर्‍यांनीही शेतीची कामे उशीरा करण्यास सुरूवात केली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!