Type to search

Featured सार्वमत

जिल्ह्यात 151 छावण्यांना जिल्हाधिकार्‍यांची मंजुरी

Share
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सहा छावण्यांना मंजुरी दिल्यानंतरही संबंधितांनी त्या वेळेत सुरू न केल्याने मंजुरी दिलेल्या सहा छावण्यांचे प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत. तर 151 छावण्यांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. त्यामुळे प्रशासनाने 151 छावण्यांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आली. यासह मंजुरी दिल्यानंतरही सहा छावण्या वेळेत सुरू न केलेल्या त्यांची मंजुरी रद्द करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी येणारे प्रस्ताव नियमानुसार असल्यास छावण्यांना तात्कळ मंजुरी देण्यात येत आहे. पालकमंत्री यांचे शिफारस पत्र नसलेले प्रस्ताव देखील प्रशासनाच्या वतीने मंजूर करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पालकमंत्र्यांना छावणी मंजूर झाल्यानंतर देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी कर्जत तालुक्यातील कुंबळी व पारनेर तालुक्यातील भळवणी येथील छावण्याची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकर्‍यांनी संवाद साधला. त्यावेळी शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!