Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जिल्हा बँकेचा मे मध्ये बिगुल

Share

निवडणुकीची तयारी सुरू : मासिक बैठकीत क्रियाशील सभासदांची माहिती फायनल

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यासाठी तेवढीच महत्त्वाच्या असणार्‍या जिल्हा सहकारी बँक निवडणुकीचा बिगुल मे 2020 ला वाजणार आहे. त्यासाठी बँकेच्यावतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. गुरूवारी बँकेच्या मासिक बैठकीत बँकेच्या संचालक मंडळासमोर सहकार खात्याच्या नव्या नियमानुसार क्रियाशील, अक्रियाशील सभासदांची माहिती सादर करण्यात आली. लवकरची ही माहिती निवडणुकीची जबाबदारी असणार्‍या सहकार खात्याला सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या मे महिन्यात होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय समिकरणं बदलली असून अनेक तालुक्यात विद्यमान आमदारांचा पराभव झाला आहे. यामुळे त्या तालुक्यातील राजकीय समिकरणं बदलली असून त्याचा परिणाम संबंधित तालुक्यातील राजकारण आणि सहकारावर पडणार का? हे जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. यासह जिल्ह्याचे शेती आणि सहकाराचा कणा असणार्‍या तसेच 6 हजार 902 कोटींच्या ठेवी असणार्‍या संस्थेवर आपले वर्चस्व राहवे, यासाठी जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून काट्याची टक्कर होणार आहे.

आशिया खंडात नगरची जिल्हा सहकारी बँक अग्रेस आहे. या बँकेवर आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिलेले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर अनेक तालुक्यातील नेत्यांनी भाजप आणि शिवसेना प्रवेश केल्याने आता जिल्हा बँक कोणाच्या ताब्यात राहणार यासाठी मे महिन्यांची वाट पाहवी लागणार आहे.

विद्यमान परिस्थितीत जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे वर्चस्व आहेत. मात्र, या दोन्ही पक्षाचे संचालक असणार्‍यांचे नेत्यांनी भाजप प्रवेश केलेला आहे. यामुळे बँकेवर राजकीय वर्चस्व कोणाचे हा प्रश्न सभासदांना आहे. बँकेचे 21 संचालक असून त्यात दोन संचालक हे स्वीकृत संचालक आहेत. बँकेच्या 5 हजजार 821 सभासद संस्था असून त्यातून 5 हजार 591 नोंदणीकृत संस्था आहेत. उर्वरित संस्था वेगवेगळ्या कारणामुळे सहकार खात्याने विर्सजित केलेल्या आहेत. यासह 908 व्यक्तीगत सभासद आहे. यातील बहुतांशी सभासद हे नगर शहर आणि कोपरगाव तालुक्यातील आहेत.

असे आहेत संचालक
14 सोसायटी मतदारसंघ, शेती पूरक आणि पणन संस्था, बिगर शेती, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, विमुक्त जाती या प्रवर्गाचा प्रत्येकी 1 आणि 2 महिला राखीव अशा 21 संचालकांच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

जिल्हा बँकेच्या काल झालेल्या मासिक बैठकीत बँकेच्या पुढील काही महिन्यांनी होणार्‍या निवडणुकीसाठी सभासदांची माहिती सादर करण्यात आली. लवकरच ही माहिती सहकार खात्याला प्राप्त होणार असून त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
– दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक, नगर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!