बंधनपत्र उल्लंघनप्रकरणी 20 हजारांचा दंड; जिल्ह्यात पहिली कारवाई

0

श्रीरामपूरच्या प्रांताधिकार्‍यांचा आदेश

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – अवैधरीत्या हातभट्टी दारू विक्री करणार्‍यांविरुध्द मुंबई दारूबंदी कायदा अंतर्गत कलम 93 नुसार चांगल्या वर्तवणूक व वर्षभर गुन्हा न करण्याच्या बंधनपत्राचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन आरोपींविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात अशा प्रकारची पहिलीच कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. श्रीरामपूरचे प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी याबाबत विजूबाई तुकाराम जाधव (रा. सरस्वती कॉलनी, वॉर्ड नं.7, श्रीरामपूर) व इंदूबाई विष्णु जाधव (रा. वॉर्ड नं. 7, श्रीरामपूर) या दोन आरोपींकडून प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

संबंधित आरोपी अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारु विक्री करताना आढळून आले होते. त्यावेळी आरोपींविरुध्द दारुबंदी कायदा कलम अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तसेच सदर आरोपींकडून मुंबई दारूबंदी कायदा अंतर्गत कलम 93 नुसार चांगल्या वर्तणूक व वर्षभर गुन्हा न करण्याचे बंधनपत्र घेऊन दंड करुन जामीन घेण्यात आलेला होता. मात्र वर्षाच्या आत पुन्हा गुन्हा केल्याने सदर आरोपींवर ऑफ बॉण्डचा प्रस्ताव तयार करून प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांच्याकडे सादर केला. प्रांताधिकार्‍यांनी विजूबाई तुकाराम जाधव व इंदुबाई विष्णु जाधव या आरोपींना प्रत्येकी 10 हजार रुपये असे एकूण 20 हजार रुपयांचा दंड केला आहे.

LEAVE A REPLY

*