Friday, April 26, 2024
Homeनगरपिंप्री घुमट येथे सॅनिटायझरचे वाटप

पिंप्री घुमट येथे सॅनिटायझरचे वाटप

सार्वमत

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नगर तालुक्यातील पिंप्री घुमट ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच रभाजी सुळ यांच्या हस्ते गावात सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

- Advertisement -

कोरोना विषाणूची लागण होऊ नये, यासाठी हात स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला जातो आहे. सर्वाधिक संसर्गाचा धोका हातामुळेच आहे, असंही तज्ज्ञांचे मत आहे. वारंवार हात धुवा आणि सॅनिटायझरने निर्जंतुक करा, असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे पिंप्री घुमट येथे सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

काही सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचा वापर केलेला असतो. अल्कोहोल हा द्रवपदार्थ ज्वालाग्रही असून तो पटकन पेट घेतो. त्यामुळे ग्रामस्थांनी हँड सॅनिटायझर वापरताना काळजी घ्यावी, अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर काळजीपूर्वक वापरले नाही, तर जिवावर बेतू शकते म्हणून स्वयंपाकाचा गॅस, चूल किंवा कुठल्याही आगीजवळ हँड सॅनिटायझरचा वापर करू नये, आवश्यक तेवढेच सॅनिटायझर हातावर घ्यावे आणि हात चोळून ते पूर्ण कोरडे झाल्यावरच पुढच्या कामाला लागावे. – रभाजी सुळ (सरपंच, पिंप्री घुमट )

- Advertisment -

ताज्या बातम्या