Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedखाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण बंद

खाजगी वाहनांना नगरपालिका हद्दीत पेट्रोल व डिझेल वितरण बंद

नंदुरबार  –

नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा व धडगाव नगरपालिका हद्दीतील व अक्कलकुवा ग्रामपंचायत हद्दीतील पेट्रोल पंपावरून सर्व दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना पेट्रोल व डिझेलचे वितरण 31 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीपासून बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

- Advertisement -

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असूनही जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांना घराबाहेर निघण्याची सवलत देण्यात आली आहे. या सवलतीलचा गैरफायदा घेऊन नागरिक अनावश्यकरित्या दुचाकी व इतर वाहनांमधून फिरत असतात. त्यामुळे प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर प्रतिकूल परिणाम होण्याची आणि कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने सदर निर्बंध घालण्यात आले आहेत.

वरील क्षेत्रात पेट्रोल पंप धारकांनी केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या वाहनांनाच पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून द्यावे. अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या वाहनांसाठी तसे पासेस नगरपालिका मुख्याधिकारी व ग्रामपंचायत अक्कलुकवाचे ग्रामसेवक यांनी द्यावेत.

नागरिकांनी किरणा, दूध, भाजीपाला व औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आवश्यकता असेल त्यावेळी वाहनाचा वापर करू नये. अशावेळी शक्यतो जवळच्या ठिकाणावरून वस्तू खरेदी कराव्यात. जवळ वस्तू उपलब्ध होण्यासाठी तालुका प्रशासनामार्फत वॉर्डनिहाय व कॉलनीनिहाय नियोजन करण्यात आले आहे.

या आदेशाचा भंग करणार्‍या पेट्रोल पंप धारकांवर भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या