Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिकला पावसाने झोडपले; गंगापूर धरणातून 'इतका' विसर्ग

नाशिकला पावसाने झोडपले; गंगापूर धरणातून ‘इतका’ विसर्ग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

काल रात्रभर नाशिक जिल्ह्यात विजेचा कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. तसेच अनेक ठिकाणची वीजपुरवठाही खंडित झाल्याचे चित्र आहे…

- Advertisement -

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने आज दुपारी १ वाजता गंगापूर धरणातून ६ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. सध्या गंगापूर धरणातून चार हजार १५८ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तो एक वाजता ६ हजार क्युसेस करण्यात येणार आहे.

होळकर पुलाखालून सध्या ७ हजार ५१५ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे गोदाकाठावर पूरपरिस्थिती आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम राहिला तर पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल. तसेच नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या