दिग्दर्शक नीरज व्होरा दहा महिन्यांपासून कोमात!

0

अभिनेते,दिग्दर्शक, निर्माता नीरज व्होरा गेल्या दहा महिन्यांपासून कोमामध्ये आहेत.

‘हेराफेरी’,‘चांची 420’ या सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले नीरज व्होरा यांना गतवर्षी १९ आक्टोबरला हार्ट अटॅक आला आणि यानंतर ब्रेन स्ट्रोक आल्याने ते कोमात गेले.

एम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरु  होते. अलीकडे त्यांचे जवळचे मित्र फिरोज नाडियाडवाला यांच्या ‘बरकत विला’ या बंगल्यात त्यांना हलवण्यात आले आहे.

११ मार्चपासून नादियाडवालांच्या घरातील एका रुमचे रुपांतर आयसीयूमध्ये करण्यात आले आहे.

व्होरा यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी २४ तास नर्स, वॉर्डबॉय नियुक्त करण्यात आले आहेत.

फिजिओथेरपिस्ट, न्युरोसर्जन, अ‍ॅक्युपंक्चर थेरपिस्ट आणि जनरल फिजीशियन दर आठवड्याला भेट देतात. व्होरा यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे लवकरच ते बरे होतील, अशी आशा त्यांच्या मित्रांना वाटत आहे.

LEAVE A REPLY

*