Type to search

Featured जळगाव फिचर्स

दीपनगर प्रकल्पात कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या 

Share
शहरात दोघांच्या आत्महत्या latest-news-news-two-suicides-in-city
येथील वीज निर्मिती प्रकल्पातील हायड्रोजन विभागात एका कंत्राटी कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.१५मार्च रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
 याबाबत सविस्तर माहिती असे की येथील सँनड्राज कंपनीतील कामगार भरत तायडे (वय 45 रा. कंडारी) याने पाळीवर असतांना दुपारी दोन ते रात्री दहाच्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
रात्री दहाच्या नंतर दुसऱ्या पाळी वर आलेल्या कामगार याला दिसल्या नंतर त्याने सुरक्षा व्यवस्थापक याना माहिती दिली. तायडे याने आत्महत्या का केली याबाबत माहिती मिळू शकली नाही. रात्री उशिरापर्यंत पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!