Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यादीपाली सय्यद यांचा पक्ष प्रवेश रखडला? भाजपकडून विरोध?

दीपाली सय्यद यांचा पक्ष प्रवेश रखडला? भाजपकडून विरोध?

मुंबई | Mumbai

शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. शिवसेनेतल्या बंडानंतर त्यांनी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांनी एकत्र येण्याची मागणी केली होती. तसंच आपण त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सांगितलं होतं.

- Advertisement -

मात्र अलीकडेच त्यांनी यू-टर्न घेत शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार दीपाली सय्यद या आज शिंदे गटात प्रवेश करणार होत्या. बुधवारी (९ नोव्हेंबरला) दिपाली सय्यद यांनी आधी मीडियासमोर येऊन प्रतिक्रिया दिली होती की आज प्रवेश होईल, मात्र तेव्हाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) त्यांना भेटले नाहीत. त्यामुळं त्यांचा प्रवेश होऊ शकला नाही. त्यामुळं आता सय्यद यांचा शिंदे गटात कधी प्रवेश होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भाजपकडून अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध दर्शवण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दीपाली सय्यद यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे शिंदे गटातील प्रवेशाला भाजपचा तीव्र विरोध केला होता. शिंदे गटाने पक्ष प्रवेश दिल्यास भाजप- शिंदे गटातील संबंधांमध्ये तणाव निर्णाण होऊ शकतो. या भीतीने शिंदे गटातील प्रवेश लांबवला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या