Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

फाईल गहाळ, उडवा उडवीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आमदारांचा जि. प.त ठिय्या

Share

नाशिक l प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने महत्वाच्या कामाच्या फाईल गहाळ केल्या. तसेच वेळोवेळी उडवा उडवीची उत्तरे दिली. प्रकरणाचा खुलासा करावा, तसेच अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी दिंडोरी पेठचे राष्ट्रवादी आमदार नरहरी झिरवाळ यांनी कालपासून जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. न्याय मिळाल्याशिवाय येथुन हटणार नाही असा पावित्रा घेतल्याने खळबळ उडाली आहे.

दिंडोरी तालुक्यातील चौसाळे आणि सावरपातळी येथे सिमेंट काँक्रीट बंधारे बांधणे या निविदा प्रक्रियेत कार्यकारी अभियंता ल.पा. यांनी त्यांच्या अधिकारात अनियमितता केल्याने व त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सदरच्या नस्ती विभागातून गहाळ झाल्याचे सांगण्यात आले. या सर्व प्रकरणाचा खुलासा अजून पर्यंत झाला नाही.

प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, तसेच संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आपण जिल्हा परिषदेतून हटणार नाही असा पावित्रा त्यांनी घेतला आहे.

याबाबत त्यांनी विभागीय आयुक्तांना देखील पत्र लिहिले आहे मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.

दरम्यान, रात्री उशिरा संबंधित अधिकारी, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांनी आमदार झिरवाळ यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र तो फोल ठरल्याची माहिती मिळते आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!