Friday, April 26, 2024
Homeनाशिकउद्यापासून दिंडोरी पूर्णपणे लॉकडाऊन; बाजारही राहणार बंद

उद्यापासून दिंडोरी पूर्णपणे लॉकडाऊन; बाजारही राहणार बंद

file photo

दिंडोरी । दिंडोरी शहरात उद्या (दि.10()  पासुन ते 15 एप्रिल पर्यंत संपुर्ण दिंडोरी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन त्यामुळे आता 15 तारखेपर्यत बाजार ंबंद रहाणार आहे. या निर्णयामुळे करोनाचे संकट किती गडद आहे याची जाणीव दिंडोरीकरांना होणार आहे.

- Advertisement -

दिंडोरी शहरात अनेक ग्राहक भाजीपाला घेण्यासाठी प्रचंड गर्दी करीत होते. अनेक वेळा सांगुनंही भाजीपाला विक्रेते व ग्राहक यांच्या गर्दीमुळे लॉकडाऊनच्या निर्णयाला शिथिलता आली होती.

त्यामुळे दिंडोरी शहरातील सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्रित येत शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत तहसिलदार कैलास पवार, पोलिस निरीक्षक अनिल बोरसे, मुख्याधिकारी डॉ.मयुर पाटील यांनी प्रशासनाची बाजु मांडली.

ग्रामस्थांच्यावतीने उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, गटनेते प्रमोद देशमुख, माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, ,दिंडोरी तालूक शेतकरी संघांचे चेअरमन दिलीप जाधव, अविनाश जाधव  यांनी बाजु मांडली. अखेरीस मालेगाव पर्यत पोहचलेला करोना दिंडोरी शहरात येऊ नये यासाठी 15 एप्रिल पर्यत दिंडोरी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यास प्रशासनाने संमती दिली. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात ठरलेल्या चर्चेनुसार दिंडोरीत रोजचा भरणारा भाजीपाला बाजार भरणार नाही. त्याऐवजी दिंडोरी शहरात दारोदारी भाजीपाला विकण्यास शेतकर्‍यांना, विक्रेत्यांना परवानगी राहिल.त्यात त्यांनी ग्राहकांची गर्दी केलेली आढळल्यास व विना मास्क विक्री केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

मांस विक्रेत्यांंना 15 एप्रिल पर्यत दुकाने बंद ठेवावी लागतील. कृषी सेवा केंद्र व किराणा दुकानांना सकाळी 9 ते 12 या वेळेत एक दिवसाआड दुकान सुरु ठेवता येईल, त्यात त्यांनी नियमांचे पालन करावे. विनाकारण वाहने फिरवणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल आदी महत्वपुर्ण निर्णय झाले.

अत्यांवश्यक सेवा सुुरु रहातील. दिंडोरी शहरात कोणीही नियंमांचे उल्लघंन करु नये, सर्वांनी एकजुटीने करोनाचा सामना करावा असे आवाहन उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, प्रमोद देशमुख, भाऊसाहेब बोरस्ते, दिलीप जाधव आदींनी केले. यावेळी प्रशासन अधिकारी पोतदार, अभियंता भामरे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या