Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरी : चिंचखेड येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Share

दिंडोरी : तालुक्यातील चिंचखेड येथील दत्तात्रय देवराम पाटील हे शनिवारपासून घरातून बेपत्ता झाले होते. दरम्यान आज (दि. २९) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पालखेड डावा कालव्याच्या पाण्यामध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह नागरिकांना दिसून आला. परंतु मृतदेह पाण्यात असल्याने ओळख पटत नव्हती.

अथक प्रयत्नानंतर घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असता शनिवार पासून बेपत्ता असलेले चिंचखेड येथील रहिवाशी दत्तात्रय देवराम पाटील यांचा मृतदेह असल्याचे आढळून आले.

दरम्यान गेल्या सहा दिवसांपासून पाटील बेपत्ता असल्याने त्यांचे कुटुंब अत्यंत भयभीत झाले होते. मंगळवारी पाटील यांच्या कुटुंबीयांनी वणी पोलीस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तसेच व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून देखील पाटील यांच्या फोटोसह माहिती देण्यात आली होती. पाटील यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.

पाटील यांच्यावर बँक ऑफ इंडियाचे २५ लाख रुपयांचे कर्ज असल्याने काही दिवसांपासून बँकेतून फोन येत होते. त्यामुळे पाटील हे एक ते दोन महिन्यांपासून आजारी झाले होते. परंतु सततची नापिकी आणि वाढत चाललेला कर्जाचा डोंगर त्यामुळे बँकेचे कर्ज भरण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी नैराश्यातून शनिवारी २४ ऑगस्ट रोजी घराजवळ असलेल्या पालखेड डावा कालवा मध्ये उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. वणी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास वणी पोलीस करत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!