Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरी : आंबेवणी, करंजीरोड येथील बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार

Share

दिंडोरी : आंबेवणी, करंजीरोड या ठिकाणी बिबट्याने शेतकऱ्याच्या घरासमोरील पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये कुत्रा जागीच ठार झाला असून बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची दहशत असून हे बिबटे मानवी वस्तीत येऊन जनावरांची शिकार करत आहेत. दिवसेंदिवस परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडत असून यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दोनतीन दिवसांपूर्वी एका लहान बालकांवर बिबट्याने हल्ला चढविला होता. त्यापूर्वी दोन बालकांचा जीवही बिबट्याने घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक परिसरात बिबट्याचा वावर आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!