Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

डॉ. भारती पवार विजयाच्या उंबरठ्यावर; दोन लाखांची निर्णायक आघाडी

Share

नाशिक | प्रतिनिधी

एकविसाव्या फेरीअखेर डॉ. भारती पवार यांना 5 लाख 19 हजार 604 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या धनराज महाले यांना 3 लाख 36 हजार 166 मते मिळाली. यात डॉ पवार यांनी 1 लाख 83 हजार 438 मतांनी आघाडी घेतली आहे. ठिकठिकाणी डॉ. पवार यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली आहे.

गेल्या तीन निवडणुकीत भाजपाची सत्ता असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपाने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविले होते. त्यांच्या विरोधी वातावरण या मतदारसंघात दिसून आले, मात्र, आज जेव्हा निकालाचे कल आले त्यानंतर भाजप दिंडोरीची जागा अबाधित ठेवण्यात यशस्वी झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर साधारणपणे दुस-या फेरीपासून भाजपच्या डॉ. पवार यांनी आघाडी घेतली होती.

एकविसाव्या फेरीअखेर डॉक्टर भारती पवार यांना 5 लाख 19 हजार 604 तर धनराज महाले यांना 3 लाख 36 हजार 166 मते मिळाली. यात डॉक्टर भारती पवार या 1 लाख 83 हजार 438 मतांनी आघाडीवर होत्या.

गेल्या निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण यांना ५ लाख ४२ हजार ७८४ मतं मिळाली होती, तर डॉ. भारती पवार यांना२ लाख ९५ हजार १६५ मतं मिळाली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!