Type to search

नाशिक

दिंडोरी : परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात अकरा वर्षीय मुलगा जखमी

Share

दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथे बिबट्या च्या हल्ल्यात अकरा वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. या घटनेंने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान परमोरी शिवारात राजेंद्र काळोगे यांचे शेती आहे. सायंकाळी राजेंद्र काळोगे हे टोमॅटो शेतात असतांना शुभम तेथेच होता. यावेळी दाब धरून बसलेल्या बिबट्याने शुभमच्या गळ्यावर झेप घेत त्याला जखमी केले. शुभमने आरडाओरड केल्याने त्याच्या आईवडिलांनी बिबट्याला पळण्यास भाग पाडले. बिबट्याने घाबरून शुभमला टाकून पळ काढला.

जखमी शुभमला दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांनतर त्यास नाशिक येथे हलवण्यात आले. या पूर्वी परमोरी परिसरात बिबट्या च्या हल्ल्यात दोन मुले मयत झाली आहे तर तीन जखमी झाले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून शेतकऱ्यांना काम करतांना भीती वाटू लागली आहे. आमदार नरहरी झिरवाळ व रा.कॉ.तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांनी प्रशासन व वन विभागाशी संपर्क साधला व योग्य औषधोपचार मिळण्याची सूचना केली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!