दिंडीतील वारकर्‍याचा विहिरीत पडून मृत्यू

0
वाकडी (वार्ताहर) – पायी दिडींत सहभागी होऊन पांडुरंगाच्या दर्शनास पंढरपूर येथे चाललेल्या वारकर्‍यास करमाळा येथे पहाटे काळाने घाव घालत या वारकर्‍याला मुक्कामाशेजारी असलेल्या विहिरीचा अंधारात अंदाज आला नसल्याने तोल जाऊन मुत्यू झाला.
सध्या आषाढी वारी चालू आहे, रांजणगाव खुर्द मधील मोहन नामदेव घोगळ (वय 75) हे वाकडी येथील जय मल्हार पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते. मात्र गुरुवार दि. 29 जून रोजी दिंडी करमाळा सोलापूर येथे मुक्कामी होती.
मुक्काम ठिकाणी मयत मोहन घोगळ हे पहाटे 4.45 च्या सुमारास उठल्यानंतर मुक्कामाच्या जवळच अष्टकोनी विहीर असल्याने व मुक्काम ठिकाणी लाईटच्या प्रकाशामुळे त्यांना विहीरीचा अंदाज आला नाही व त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले.
विहिरीची खोली जास्त असल्याने व बारवाला पायर्‍या असल्याने सुमारे 40 फुटावर ते पायरीवर आपटून त्यांच्या डोक्याला, छातीला, पायाला जबर मार लागला. त्यांना उपचारासाठी करमाळा येथून 101 क्रमांक डायल करून तात्काळ वैद्यकीय पथक तिथे हजर झाले. पण त्या अगोदरच त्यांची प्राणज्योत मावळली होती. अशी माहिती प्रत्यक्ष दर्शीकडून समजली.
त्यानंतर करमाळा तालुका पोलीस स्टेशन येथील हे.कॉ. व्ही.एस. कांबळे यांनी पंचनामा करून रजि. नं. 56/17 अन्वये 174 अपघाती मृत्यूची नोंद केली व करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करून नातेवाईकांकडे मृतदेह सोपवण्यात आला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दिंडीमध्ये शोकाकूल वातावरण पसरले. शिवाजी लहारे, अशोक शेळके, रामभाऊ शेळके, चांगदेव पावसे, प्रदीप जगदाळे यांनी तात्काळ प्रसंगवधान दाखवत घटनेची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन व वैद्यकिय अधिकारी यांना दिली.
घटनेमुळे गणेशनगर परिसर व वारकर्‍यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. दुपारी 3 वाजता त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात गणेशनगर येथे अंत्यसंस्कार आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परीवार आहे. यावेळी रांजणगाव, वाकडी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिक नागरिकांनी व पदाधिकार्‍यांनी केली मोलाची मदत – स्थानिक नागरिकांनी व पदाधिकार्‍यांनी केली मोलाची मदत  या घटनेनंतर सर्वांची धावपळ उडाली पण यात देवीचा माळ येथील सरपंच मोहनराव फलफले, वैद्यकीय अधिकारी व पोलीस प्रशासन, करमाळा तसेच बाबासाहेब गोरे, पोपट कासार, गोरक्ष गाढवे यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ योग्य ती माहिती देऊन मदत केली. त्यामुळे पुढील शासकीय सर्व कागदपत्रांची पूर्तता करून मृतदेह नातेवाईकांना सुपुर्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

*