डिंभे धरणातून 2500 ने विसर्ग

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- कुकडी प्रकल्प समूहात सर्वात मोठे असलेले डिंभे धरण ओव्हरफ्लो झाले असून 11299 दलघफू पाणीपातळी कायम ठेऊन नदीत 2500 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.  सुमारे 36 टीएमसीची एकूण साठवण क्षमता असणार्‍या कुकडी प्रकल्पात कालअखेर 20हजार 510 टीएमसी(67.16 टक्के) पाणी जमा झाले.
1100 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. कुकडी प्रकल्पात सर्वात मोठे धरण डिंभे. साडेतेरा टीएमसी पाणी साठवणक्षमता असणारे हे धरण 90 टक्के भरले आहे. या पाणलोटात पावसाचा जोर ओसरला होता. सव्वा टीएमसीचे वडज धरणात 59 टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या यात 669 दलघफू पाणी आहे. येडगाव धरण 91.50 टक्के भरले असून कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. पिंपळगाव जोगे धरणातील पाणीसाठाही वाढत असून तो 24 टक्क्यांवर पोहचला. साडेदहा टीएमसीच्या माणिकडोह धरण निम्मे भरण्याच्या मार्गावर आहे.

LEAVE A REPLY

*