दिलीप भंडारी यांचे अपघाती निधन

0

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- येथील प्रसिध्द हस्तरेषातज्ज्ञ कांतिलाल भंडारी (वय 62) यांचे चिरंजीव दिलीप भंडारी यांचे काल अपघाती निधन झाले. विमा प्रतिनिधी म्हणून काम पहाणारे दिलीप भंडारी व त्यांच्या पत्नी उषा भंडारी हे दोघे दौंड तालुक्यातील वरंवड येथे अंत्यसंस्कारासाठी मारूती कारने गेले होते. हा विधी उरकल्यानंतर ते श्रीरामपूरला येण्यास निघाले. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा-अरणगाव रोडवरील खडकी खंडाळा येथे आले असता त्यांच्या कारला अपघात झाला. त्यात दिलीप भंडारी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी उषा यांनाही मार लागला असून त्यांच्यावर नगर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची अंत्ययात्रा आज मंगळवार दि. 16 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता वॉर्ड नं. 7 मधील वढणे वस्ती परिसरातील निवासस्थानापासून निघणार आहे. त्यांच्या पश्‍चात आई-वडिल, दोन भाऊ,पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. उदय व प्रवीण भंडारी यांचे ते थोरले बंधू तर वैभव भंडारी यांचे ते वडिल होत.

LEAVE A REPLY

*